Tuesday, November 6, 2018

सम्राट अशोकाचा भारत घडवूया

*सम्राट अशोकाचा भारत घडवूया*
- प्रमोद शिंदे (9967013336)

आम्ही बाबासाहेब यांचे पुतळे मागितले.
त्यांनी दिले, आम्ही खुश,
सोबत त्यांनी देशाची समानता मातीत गाडणाऱ्या  मनू आणि परशुरामाचे सुद्धा पुतळे दिले.

आम्ही शिवरायांचे पुतळे मागितले
त्यांनी दिले, आम्ही खुश
सोबत त्यांनी शिवरायांनाचं बदनाम करणाऱ्या दादोजी आणि रामदास यांचे सुद्धा पुतळे दिले.

आम्ही नीतिवान संभाजी राजांचे पुतळे मागितले.
त्यांनी दिले, आम्ही खुश
सोबत त्यांनी मस्तानीचा हिरो  बाजीरावाचे पुतळे दिले.

आम्ही चैत्यभूमीचा विकास मागितला.
त्यांनी केला, आम्ही खूश त्यांनी बाजूलाच गणेश विसर्जन घाट ही सजवला.

आम्ही गल्लीत बुद्धविहार  मागितले,
त्यांनी दिले, आम्ही खुश,
त्यांनी दुपट्टीने गल्लीत साई आणि गणेशाची मंदिरं बांधली.

आम्ही शिवस्मारक, आंबेडकर स्मारक मागितले.
ते देतील, आम्ही खुश होवू
परंतु सोबत ते आम्हांला परशुराम, मनू, आणि राम मंदिर देतील.

आम्ही पुतळे मागितले, त्यांनी धर्मांधता दिली.
आम्ही कौटुंबिक मालिका मागितल्या.
त्यांनी चमत्कार दाखविले.

आम्ही आमचा हक्क मागितला, त्यांनी जातीजातीत भांडणं लावली.

आम्ही रायगडावर लाखोने जमून घोषणा दिल्यात.
त्यांनी आम्हांला अनवाणी शिर्डीला चालत नेलं.

आम्ही चैत्तभूमी, दीक्षाभूमी वर लाखोने रांगा लावल्या.
त्यांनी आम्हांला लालबागला लाथा खायला रांगेत उभे केलं.

आम्ही कुठे चुकलो हे कधीच नाही समजलं, त्यांना समजलं त्यांनी आमच्या नेत्याच्या बुडाखाली लाल दिवा दिला,
आम्ही खुश,  त्यांनी आम्हांला कधी वानर बनवून, त्यांच्या मागे घोषणा द्यायला लावलं, आम्हाला हेही कळलं नाही.

आपण लांडग्यांच शेपूट धरलं, महामंडळ मागितलं त्यांनी आपलं चळवळी चं केंद्र वसतिगृह आणि भवनच उध्वस्त केलं.

आता बस करा मागणे.
मागणारे हात खाली करा, देणारे हात वर करा.
विचार देऊया, कार्य देऊया , शिक्षण देऊया, प्रेरणा देऊया.

ते बाबासाहेब, फुले, शाहू, अण्णा भाऊ यांचा विरोध करतात म्हणून त्यांचा विरोध करू नका.
त्यांना बाबासाहेब, फुले शाहू अण्णा भाऊ समजून सांगा.
ते ऐकणार नाहीत, तरीही आपण सांगत राहुयात.

त्यांनी त्यांचाच बुद्ध नाकाराला तरीही आपण संत तुकाराम स्वीकारून, त्यांना बहिणाई च्या  शब्दातुन तुकारामांच्या वाणीतला बुद्ध सांगूया.

पंजाब मधून संत नामदेवाना परत आपल्या घरी आणून वारकऱ्यांमध्ये पेरूया.

गल्लीतल्या भैया कडे डोळे वटारून बघण्यापेक्षा गल्लीतले दारूचे धंदे बंद करूया.

गल्लीतल्या नेत्या मागे बीअर आणि चिकन साठी फिरणे बंद करून आपल्या घरी बोलावू, आपली परिस्थिती दाखवू, माझा बाप माझ्यासाठी कसा राबराब राबतोय, आई कशी मर मर मरते, हे दाखवू,

ते जय शिवराय म्हणतील तर त्यांना रायगडावर चल म्हणा, मदारी मेहतर ची कबर आणि मशीदित वसलेला जगदीश्वर बघ म्हणा.

ते जय महाराष्ट्र म्हणतील तर आपण त्यांना त्यांचाच संस्थापक बाळासाहेबानीही स्वीकारलेला प्रबोधनकार सांगूया.

ते जय मनसे म्हणतील,आपण  त्यांना नरेंद्र दाभोळकर यांच्या पाठीशी उभे राहून बुवा बाबांना झोडपनारा राज दाखवू.

ते जय भीम म्हणत तुम्हाला गोयंका चा बंद डोळ्यांचा ध्यानस्थ बुद्ध दाखवतील, आपण त्यांना बाबासाहेबांच्या कुंचल्यातला उघड्या डोळ्यांचा कृतीशील बुद्ध दाखवू.

ते भारताला हिंदुस्थान म्हणतील, आपण भारताला भारतच म्हणूया,

ते आरक्षण बंद करा म्हणतील, त्यांना म्हणूया, त्या टीव्ही च्या चौकोनातून बाहेर ये, ते माझी खरी परिस्थिती दाखवणार नाहीत, 4 दिवस माझ्या गावी राहायला ये, रहा माझ्या सोबत, जग माझ्यासारखं.

कधीतरी, तुम्ही भाकरी साठी नोकरी मागाल, तर ते जयंती मोठी करू म्हणतील,

तुम्ही पाणी मागाल तर, गणपती ची मोठी मूर्ती आणू म्हणतील,

तुम्ही चांगले शिक्षण मागाल तर ते  देवीला डीजे लावून देतो म्हणतील, नाचा खुशाल.

आपण मागत राहू, ते दुपटीने देतील, दुसऱ्या बाजूने आपले जगण्याचे श्वास रोखतील, प्रगती चे दोरखंडच कापतील.

आतां आपण मागणारे न होता देणारे होऊया,
प्रमोद शिंदे  सांगतो ही बुद्ध वाणी, मी म्हणून न करता, बुद्धीच्या जोरावर तपासून अमलात आणूया,
पुन्हा एकदा अशोकाचा भारत घडवूया.
शिव शंभू फुले शाहू आंबेडकर, अण्णा भाऊ यांचा वारसा चालवूया.
बुद्ध नामदेव कबीर तुकाराम भगतसिंग सोबत क्रांतीचे गीत गाऊया.
पुन्हा एकदा अशोकाचा भारत घडवूया.
पटलं असेल तर पुढे इतरांना हि पाठवू या.
पुन्हा एकदा अशोकाचा भारत घडवूया.
*-प्रमोद शिंदे (9967013336)*
*भारत संस्कार आंदोलन*

Friday, June 15, 2018

भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी काढले नविन अस्त्र "भावनिक अस्त्र"

  1. भाजप आणि नरेंद्र मोदी यानी काढले नवीन अस्त्र
    "भावनिक अस्त्र"

  2.              भारतभरातील सर्वच पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर (अपवाद पालघर, परंतु तोही उमेदवार स्वतःचा न देता कॉंग्रेस चा आयात केलेला) भाजप आणि नरेंद्र मोदी यांची सर्व अस्त्र अपयशी ठरल्यामुळे आता भाजप, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी नविन भावनिक अस्त्र काढले आहे.
    यात भाजपचे फेकलेले तुकडे खाणारे चॅनेलवाले सोबतीला आहेच.
    निवडणुकीअगोदर "छत्रपती शिवरायांचा आशिर्वाद आणि चला देवू मोदिना साथ" अशी घोषणा देणारे भाजप आणि चॅनेलवाले यांन...ी रायगडावरील शिवराज्याभिषेक कार्यक्रम ज्याला लाखो मावळे जमले त्याचे थेट प्रक्षेपण सोडा साधी बातमी दिली नाही. (ज्यानी लाजेखातर छोटी का होइना बातमी दिली असेल त्यानाही लागु )
    परंतु याच चॅनेलवाल्यानी संघाचा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित करुन दाखवला हेच नाही तर अमित शाह माधुरी ला भेटले, काय बोलले? हे तर सतत सतत दाखवित होते.
    असो मुद्दा हा आहे की, नरेंद्र मोदी आणि फडणवीस याना नक्षलवाद्याकडून धमकी.
    अहो आता निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना,
    आता काय करावे हेच सुचेनासे झालेय, मग काय करा? "रडा" आणि लोकांसमोर भावनिक मुद्दा मांडा.
    पेट्रोल आणि डिजेल ची झालेली ऐतिहासिक दरवाढ,
    त्यामुळेच वाढलेले जीवनावश्यक वस्तूंचे भाव.
    नोटबंदी मुळे बाहेर न आलेला एकही काळा पैसा.
    कार्ड, ऑनलाईन आणि चेक न स्विकारता उलट सगळी कडे हार्ड कॅश चीच मागणी असल्याने त्यातल्या त्यात एटीएम मध्ये खडखडात त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांत निर्माण झालेला असंतोष.
    गृह आणि उद्योग कर्जाच्या योजनासह इतर ही योजनांची झालेली फजिती.
    एका बाजुला शेतकरी आत्महत्या आणि गरिबी ची रेषा वाढत असताना दुसऱ्या बाजूला भाजपला निवडणूकीत सहकार्य करणारे अंबानी, अडाणी आणि रामदेव बाबाची वाढत चाललेली संपत्ती.
    गोरक्षा, हिंदुत्व लव जिहाद आणि दलितांवरील अत्याचार यामुळे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा दिसू लागलेला मलिन चेहरा
    अशावेळेस काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या निवडणुकिना सामोरे जायचे तर आता एकच मार्ग... भावनिक करा.
    २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी याना पुढे करुन गुजरात चा विकासक म्हणून मते मागितली, आता त्याचाही फुगा फुटला, मग आता याच नरेंद्र मोदी याना मारण्याची धमकी असे सांगून नरेंद्र मोदी याना पुन्हा हीरो बनवून समस्त भारतीयांना भावनिक करण्याचे साधले आहे.
    मुळात धमकी कोणी दिली कशी दिली, सीबीआय पासून सर्वच खाती स्वतः जवळ असताना आणि यासर्व भारतीय यंत्रणा आपल्या कामाकरिता जग प्रसिद्ध असताना यावर मी बोलणे आणि लिहणे नकोच.
    मि कॉंग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक अजिबात नाही. मी शिवराय, फुले, शाहू, आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा अनुयायी असल्याने भाजप आणि संघ विरोधी नक्कीच आहे.
    ज्या भाजप पक्षाची (पुर्वीचे नाव जनसंघ) स्थापनाच स्त्री पुरुष आणि जातीय समानतेसाठी निर्माण झालेल्या हिंदू कोड बिल विरोध करण्यासाठी आणि डॉ.आंबेडकर यांच्या पुतळा जाळण्याने झाली. आज उठता बसता डॉ. आंबेडकर यांची नाव घेणाऱ्या भाजप आणि संघाने त्यानंतरही ज्योतिराव फुले यांना घाण आणि डॉ. आंबेडकर याना देशद्रोही म्हटले होते मग या अवसरवादी खोटा चेहरा पांघरलेल्या अजगराचा विरोध करणे साहजिकच आहे.
    मित्रांनो अगोदरच आपल्यातलेच काही लांडगे बुडाखाली लाल दिव्याची गाडी मिळावी यासाठी या दोघांपुढे शेपूट हलवीत आहेत. आणि वरून जर आता या बातमी ने भावनिक झालो तर कठीण होइल.
    सावधान...रात्र वैऱ्याची आहे.
    - प्रमोद शिंदे
    भारत संस्कार आंदोलन
  1. भाजप आणि नरेंद्र मोदी यानी काढले नवीन अस्त्र
    "भावनिक अस्त्र"
    भारतभरातील सर्वच पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर (अपवाद पालघर, परंतु तोही उमेदवार स्वतःचा न देता कॉंग्रेस चा आयात केलेला) भाजप आणि नरेंद्र मोदी यांची सर्व अस्त्र अपयशी ठरल्यामुळे आता भाजप, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी नविन भावनिक अस्त्र काढले आहे.

    See More