एकनाथ
खडसे बाबत नारायण राणे यांचे विधान, कितपत खरे? कितपत खोटे?
दिनांक ४ जुन रोजी झी २४ तास या वाहीनी वर
रात्रौ ९ वाजता रोखठोक मध्ये “एकनाथ खडसे यांचा राजीनामा” या विषयावर
चर्चा भरविण्यात आलेली होती. त्यात उदय निरगुडकर यानी एक मुद्दा चर्चेला घेतला, मुद्दा
होता एकनाथ खडसे यांच्या राजीनामा नाट्यानंतर नारायण
राणे यानी केलेले विधान, ते वक्तव्य असे
होते “एकनाथ खडसे यांचा राजीनामा म्हणजे बहूजन नेतृत्वाचा बळी दिला गेलाय". ह्या मुद्द्यावर सर्वप्रथम उदय निरगुडकर
यानी विश्वंभर चौधरी यांना बोलायला
सांगितले, यावर स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या विश्वंभर चौधरी यानी जो आकांडतांडव केला होता, तो त्यांची वस्तूस्थीती दाखवत होता, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आतला
चेहरा दाखवत होता. विश्वंभर चौधरी यानी नारायण राणे
यांच्यावर जे तोंडसुख घेतले ते सगळे येथे सांगण्यासारखे नाही, त्यातळे एक विधान
असे होते की, कॉंग्रेसने असल्या ........ माणसाला पक्षात घेतले कशाला? यावरूनच आपण हे असमाजू शकता की विश्वंभर चौधरी
कोणत्या ठरला गेले असतील, पुढे ते हे आठवण करून द्यायला विसरले नाहीत , राणे बहूजन असतानाही बाळासाहेबानी त्याना मुख्यमंत्री केले होते. यावरून विश्वंभर चौधरी यांना सेना भाजप कसे
पुरोगामी आहेत आणि राजकारणात सत्तेसाठी जातपात बघितली जात नाही, असे दर्शवायचे
असेल तर खरे
कारण विश्वंभर चौधरी यांना माहीत नसावे, किंवा त्यांना फक्त संघाच्या अजेंड्यावर नारायण राणे यांचे म्हणणे कसे खोटे आहे, हे आततायी पणे सांगायचे असेल.
मनोहर जोशी याना मुख्यमंत्री पदावरून दूर करून नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदावर का बसविण्यात आले
आणि तेही अगदी शेवटचे काही महिने, विश्वंभर चौधरी यांना आठवत नसेल तर येथे स्पष्ठ
करतो कि, चार वर्षानंतर मनोहर जोशी यांना पदावरून काढण्या अगोदर दोन वेळेस मनोहर
जोशी यांना पदावरून काढण्याचे प्रयत्न झालेले होते. या मागचे कारण असे होते कि,
मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर अगदी पेशवे असल्यासारखे वागत असत. कोणालाही न
जुमानता अगदी मातोश्री लाही विचारात न घेता आपले निर्णय घेत होते. त्यातल्या त्यात
मनोहर जोशी यांच्या जावयाने पुण्यातील शाळेचा भूखंड लाटल्याचे प्रकरण मनोहर जोशी
यांच्या अंगलट आले होते. मनोहर जोशी यांना काढल्यानंतर शिवसेनेतील इतर
नेत्यांपेक्षा मोठा जनाधार असलेले आणि कोकण आणि मुंबईत मोठे वर्चस्व असलेले नारायण
राणे हेच एकमेव होते. मुंबईत वसलेल्या कोकण वासीयांच्या जोरावर मोठी झालेली
असल्याने शिवसेनेला नारायण राणे यांच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे
विश्वंभर चौधरी यांचे नारायण राणे यांच्याबाबत चे विधान ते बहुजन असतानाही त्यांना
मुख्यमंत्री केले हे विधान अगदी खोटे ठरते. शिवसेनेसमोर नारायण राणे यांच्या तोडीस
तोड कोणीही नव्हते त्यामुळे नारायण राणे यांना मुख्यमंत्री करणे शिवसेनेला भाग
होते. तसेच त्यावेळेस मातोश्रीवर झालेला आर्थिक व्यवहारही लपलेला नव्हता.
आतापर्यंत उदय निरगुडकर हे
संघाचे कार्यकर्ते आहेत हे बऱ्यापैकी लोकांना माहीत
होते. कारण उदय निरगुडकर याना ठाण्यातील संघाच्या शाखेत अर्ध्या चड्डी वर जाताना पाहणारे बरेच आहेत. तसेच निरगुडकर
यानीही त्यांचे संघप्रेम कधी लपवले नाही, २०१४ च्या
लोकसभा निवडणूकीपूर्वी त्यानीही स्वतः भाजप
चे कार्यकर्ते असल्याचे जाहीर केले होते. परंतु विश्वंभर चौधरी यांचे दाखवायचे
आणि खायचे दात वेगळे आहेत, हेच या वरून दिसून आले.
दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांचे वक्तव्य हे अगदी पूर्णपणे राजकीय होते. त्या वक्तव्याचा वापर त्याना राजकारणासाठी करायचा होता, हे कोणीही अगदी सहजपणे सांगेल. परंतु त्यामूळे नारायण राणे यांचे एकनाथ खडसे बाबतचे विधान खोटे ठरत नाही.
दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांचे वक्तव्य हे अगदी पूर्णपणे राजकीय होते. त्या वक्तव्याचा वापर त्याना राजकारणासाठी करायचा होता, हे कोणीही अगदी सहजपणे सांगेल. परंतु त्यामूळे नारायण राणे यांचे एकनाथ खडसे बाबतचे विधान खोटे ठरत नाही.
हा वाद बहुजन वर्ग विरुद्ध अभिजन वर्ग असा आहे, सोप्या भाषेत
सांगायचे तर ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर समाज असा आहे, आणि यात सतत बहुजानांचाच
बळी गेलाय हेच दिसून येते. सध्या अस्तित्वात असलेल्या पैकी अधिक प्रसारमाध्यमे अभिजन
वर्गाच्या हाती आहेत. त्यामुळे ही प्रसार माध्यमे बहुजन वर्गातील व्यक्तीच्या आणि
अभिजन वर्गातील व्यक्तीच्या विधानाबाबत आणि कृतीबाबत सतत वेगळी भूमिका घेताना
दिसतात, याची काही उदाहरणे अशा प्रकारे देता येतील.
३ वर्षापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळावर भाष्य
करताना “धरणातच पाणी नसताना आता आम्ही काय त्यात मुतावे का? असे विधान केले होते.
हे विधान निश्चितच लाजिरवाणे आहे, याला कुठेही योग्य बोलता येणार नाही. परंतू या
वाक्यावर या प्रसारमाध्यमांनी अगदी तोंड फाटेपर्यंत तोंड सुख घेतले होते, अजित
पवार यांच्या विधानापेक्षा जास्तच लाजिरवाण्या भाषेत अजित पवार यांच्यावर
लाजिरवाणी विधाने केली गेली. अगदी अभिजन वर्गाच्याच हातात असलेल्या नाटक आणि
सिनेमातही याची खिल्ली उडवली गेली, ते अगदी आजही सुरु आहे. या उलट केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी ३ मे २०१५ रोजी नागपूर मध्ये भाजप पक्षाने आयोजित केलेल्या
दुष्काळावरील कार्यशाळेत एक विधान केले होते, “शेतात पाणी नसेल तर शेतात मुतावे,
याने शेत पिक दुप्पटीने वाढते, मी माझ्या १ एकराच्या जागेत असेच करतो” प्रसारमाध्यमात
ही बातमी दाखविली गेली होती. पण अजित पवार यांच्या वर या स्व-कथित समाजसेवकांनी
आणि प्रसार माध्यमांनी जे तोंडसुख घेतले तसे यावेळेस नितीन गडकरी याबाबत हे घडताना
दिसले नाही. उलट प्रसार माध्यमांनी ही बातमी दडवण्याच जास्त प्रयत्न केला.
दुसरे उदाहरण द्यायचे तर महिन्याभरापूर्वी घडलेले युवा भाजप चे मुंबई
अध्यक्ष गणेश पांडे प्रकरण आणि सध्याचे एकनाथ खडसे प्रकरण घेवूयात. दोन्ही गुन्हे
वेगवेगळे आहेत परंतू दोघांची गंभीरता कमी नाही. उलट गणेश पांडे यांनी त्यांच्याच
पक्षाच्या आणि अभिनय क्षेत्रातील एका महिला कार्यकर्त्यावर केलेला बलात्काराचा
प्रयत्न आणि त्यातून त्या महिलेने गणेश पांडे यांच्यावर केलेले आरोप हे नक्कीच
एकनाथ खडसे पेक्षा जास्तच गंभीर आहेत. परंतू ज्या प्रकारे प्रसारमाध्यमे आणि स्व
कथित समाज सेवक यांनी दिल्ली बलात्कार प्रकरणात भूमिका होती किंवा आज ज्या प्रकारे
बोलत आहेत आणि एकनाथ खडसे यांचा राजीनामा कसा योग्य आहे असे सांगत आहेत त्या
प्रसार माध्यमांनी आणि स्व कथित समाज सेवकांनी गणेश पांडे यांचे काय केले? कुठे
आहे तो ? मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षाच्याच हातात असलेल्या महिला आयोगाच्या हाती
चौकशीचे आदेश दिले, आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपाबाबत म्हणावे तर काही प्रश्न अनुत्तरीतच
आहेत. आज एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करणाऱ्या आणि उपोषणाला बसणाऱ्या अंजली दमानिया
यांनी दोन वर्षापूर्वी नितीन गडकरी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते
स्वतः कडे नितीन गडकरी यांच्या विरोधात भरपूर पुरावे असें त्या सांगत होत्या. हे
प्रकरण इतकं गाजले कि, अंजली दमानिया यांचेही रायगड जिल्ह्यातील जमिनीबाबत
घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आले होते. यावर प्रश्न असा उपस्थित होतो कि, या दोघांवरील
आरोपांचे पुढे काय झाले? आज याच अंजली दमानिया एकनाथ खडसेबाबत असाच भरपूर पुरावे
असल्याचा आरोप करताना दिसत आहेत. यावर राजकारणातील अभ्यासकांनी आणि विश्वंभर चौधरी
यानी विचार करायला हरकत नसावी.
राजकारणातील विधानाबाबत म्हणावे तर भाजप चे माजी मुंबई अध्यक्ष राज
पुरोहित यांनी ठाण्यातील पाणी पूरीवाल्याच्या प्रकरणात त्या पाणी पूरीवाल्याचे
कारस्थान आपल्या मोबाईल मधे कैद करणाऱ्या अंकिता राणे बाबत केलेले विधान काय
अभिमानास्पद होते काय? राज पुरोहित यांच्या विधानावर अभिजन वर्गातील कोणत्याही
प्रसार माध्यमांनी, समाजसेवकांनी आणि राजकीय नेत्यांनी काहीही वक्तव्य केले नाही.
एक ते दोन दिवस तेही छोटी एकादी बातमी करायची नंतर ती बातमी बुडाखाली दडवून
ठेवायची? नंतर ती कधीही बाहेर येणार नाही याची सोय करायची. अशीच अजून एक बातमी,
गोपीनाथ मुंढे यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचे पुढे काय झाले? गोपीनाथ मुंढे
यांच्या गाडीला ठोकर मारणारा वाहन चालक महिन्याभरातच स्वतः च्या घरात गळफास लावून
आत्महत्या का करतो? हे अजून गुपितच आहे. गोपीनाथ मुंढे सारख्या बलाढ्य नेत्याच्या मृत्युच्या
चौकशीचा अहवाल दोन वर्ष झाली अजून बाहेर येत नाही. ही आश्चर्याची गोष्ठ नाही का?
यावर नारायण राणे यांचे विधान खरे वाटायला हरकत नाही, अजित पवार आणि
एकनाथ खडसे यांच्या बाबत एक भूमिका घेणारी ही प्रसार माध्यमे आणि स्व कथित समाज
सेवक नितीन गडकरी, गणेश पांडे, अंजली दमानिया आणि राज पुरोहित यांच्याबाबत वेगळी
भूमिका घेताना घेताना दिसून आलेले आहे. असो नारायण राणे यांचे विधान “बहुजन
नेत्यांचा बळी दिला गेलाय” हे अगदी खरं आहे कि, अभिजन वर्ग आणि बहुजन वर्ग वादात
सतत बहुजनांचा बळी दिला गेलाय. तसेच विश्वंभर चौधरी हे अभिजन वर्गाचे कारस्थान
लपविण्यासाठी वापरण्यात आलेले वरून पुरोगामी दिसणारे बाहुले आहे हेच सिद्ध होते.
-
प्रमोद
शिंदे
मुंबई
(९ जून २०१६)
९९६७०१३३३६