माझ्या मना हो सावध !
माझ्या मना हो सावध
करण्याआधी कोणी पारध
माझ्या मना हो सावध
अरे तू कोण?
मी तर शून्य
बेकार सरकारमान्य
सरकारी गोदामात सडलेले रेशनींग चं धान्य
मी तर शून्य
म्हणून म्हणतो भीक माग
नाही मागणार !
नोकरी कोणी देणार नाही
भीक माग, भीक मिळेल
बेकारीचा प्रश्न कळेल
कारण जग बनलेलं पाषाणाचं
शासन नावाच्या हैवानांचं
गुलामगिरीचा कर वध
माझ्या मना हो सावध||
आतां तू कोण?
मी तर शेतकरी,
पुस्तकातला राजा
वास्तवात भिकारी
मी तर शेतकरी
निसर्गाच्या कोपाने मी दिन
जळणासाठी मेण
सारणासाठी शेण झालोय
निसर्गाच्या कोपाने
आज मला राम नकोय
नकोय मला बाबर
मला हवय माझं घर
आणि पोरांसाठी भाकर
नाही मिळणार !
मिळतील फक्त काठ्या आणि हातात पक्षाच्या पाट्या
सरकार आहे भांडवलदारांचं
देशभक्तीच्या नावावर आपल्याच भावांना खाणाऱ्या गिधाडाचं
भिकारपणाचा कर वध
माझ्या मना हो सावध ||
- प्रमोद शिंदे