Wednesday, November 24, 2021

गावाकडच्या गोष्टी : भाग 6

गावाकडच्या गोष्टी : भाग 6

दृश्य  : एका जिल्हापरिषद शाळेतील प्रसंग, आजच्या पेपरात आलेल्या बातमीवरून शिक्षकाने मुलांना एक प्रश्न विचारलेला होता.

गुरुजी : मुलांनो सांगा पाहू, "उद्योगपती गौतम अडाणी आणि अनिल अंबानी यांनी 2014 ला कश्यात गुंतवणूक केली असेल, ज्यामुळे या सात वर्षात यांची संपत्ती 200 पटीने वाढली?"
सगळी मुलं एकत्र : गुरुजी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात
गुरुजी : अरे वाह... कसं बरं सांगा पाहू
बंड्या : गुरुजी 2014 च्या निवडणुकीत आपले प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी देशभर फिरण्यासाठी उद्योगपती गौतम अडाणी यांचं खाजगी विमान वापरलं होतं.
गुरुजी : अरे वाह, अजून एखादं उदाहरण
राघू : गुरुजी मि सांगतो मी सांगतो... आणि या प्रचार सभेचा सर्व खर्च आणि EVM मशीन मध्ये गडबड घोटाळा करण्याचा खर्च उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केला होता.
गुरुजी : हेरे तुला कोणी सांगितलं?
राघो : सर यावर युट्युब वर एक स्टोरीच प्रसिद्ध झाली होती.
गुरुजी : अरे मग याचा आणि त्या दोघांची संपत्ती वाढण्याचा काय संबंध?
लक्षी :  याच्या बदल्यात आपले प्रधानमंत्री निवडून आल्यावर जेंव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर गेले तेंव्हा त्यांनी आपल्या सोबत उद्योगपती अडाणी आणि अंबानी यांना आपल्या सरकारी विमानातून सोबत नेलं.
विजी : आपल्याला सांगितलं प्रधानमंत्री परदेशीं गुंतवणूक आणायला बाहेर फिरत्यात पण या सात वर्षात एकबी पैसा आपल्या देशात नाय आला, पर या अडाणी आणि अंबानीचा पैसा आणि कंपन्या जगातल्या सगळ्याचं देशात उभ्या राहिल्या  की!
गुरुजी : आता हे कुठून शोधून काढलं?
मन्या : गुरुजी या दोघांच्या कंपन्या 2014 नंतर कुठं कुठं उभं राहिल्या हे समदंच त्यांच्या वेबसाईट वर दिसतंय की?
विक्या : अनं गुरुजी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या मुकेश अंबानी च्या jio ची पार जाहिरात केली की? समद्या पेपर मधी या या मोठल्या जाहिराती, त्यात प्रधानमंत्री मोदी सांगत हुते jio घ्या म्हून, आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतायेत मग काय घेतली की आम्ही समद्यानी!
रानीं : अनं आपल्या देशाच्या समद्या कंपन्या यात एअरपोर्ट, रेल्वे, ONGC अशा या 40 कंपन्या या उद्योगपती गौतम अडाणी आणि अनिल अंबानी यांना स्वस्तात विकल्या की!
भिड्या : रागावत, ये विकल्या नाय चालवायला दिल्यात 90 वर्षासाठी!
रानी : गुरुजी मला सांगा, आता ह्यो 14 वर्षाचा हाय, नव्वद वर्षांनी हा किती वर्षाचा असलं?
गुरुजी : 104 वर्षाचा
रानी : बरोबर नां,  मग ह्यो 104 वर्षाचा असताना आसल का बघायला? याची नातवंड असतील पतवंड असतील, त्यांना काय माहिती? ती काय करणार?
 आपट्या : अरे नरेंद्र मोदी यांनी किती किती चांगली कामं केलीत, जसं 370 हटवलं, तीन तलाक कायदा रद्द केला, उरी आणि पुलवामा मधी किती दहशतवादी मारले... अनं अनं सरदार वल्लभभाई यांचा किती मोठा पुतळा बांधला!
बंड्या : बरोबर आहे  गुरुजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक चांगली कामं केलीत, या उद्योगपती अडाणी आणि अंबानी यांना जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अगदी पुढं नेलं, त्यामुळे भारताची मान किती उंचावली, 370 मूळे या या भिड्या, आपट्या अनं  आम्हाला काय भी फायदा झाला नाय तरी उद्योगपती गौतम अडाणी अनं मुकेश अंबानी यांच्या कंपन्या जम्मू आणि काश्मीर मध्ये उभ्या राहिल्या.
विक्या : आमच्या दारात संडासं आली, पण संडासासाठी पाणी लय लागतंय म्हून आम्ही उघड्यावर जातं असलो म्हणून काय झालं? दारात संडासं तर आली. आता पानीं मिळल तवा वापरू की आम्ही!
चिंध्या : गुरुजी हे सगळे देशद्रोही आहेत, तुम्हाला देशाचे प्रधानमंत्री पटत नसतील तर जावा हा देश सोडून तुमच्या पाकिस्थानात!
रानी : गुरुजी, आमचे देशाचे प्रधानमंत्री ज्या पाकिस्थानात बिर्याणी खायला गेले होतें याचा आम्हाला अभिमान आहे, बिर्यानी खावी तर पाकिस्थान ची, जगासमोर किती मोठं उदाहरण ठेवलं प्रधानमंत्री मोदी यांनी!
विक्या : गुरुजी माझे आबा सांगत हुते त्यांचे बाबा स्वतंत्र लढ्यात हुते!
बंड्या : माझे आबा तर डॉ. बाबासाहेब यांच्या भाषणाला ऐकायला बाबासाहेब यांच्या मागं समदी कडे जातं हुते!

(अशा रीतीने वर्ग संपला, सगळी मुलं मुली आपल्या कामाला गेली,
बंड्या बापाला मदत करायला शेतात गेला.
विक्या बापाच्या न्हाव्या च्या दुकानात केस कसे कापायचे हे शिकायला गेला.
लक्षी, विजी आणि रानी धावत धावत घरी गेल्या, आज गावात आठवड्यानं पाण्याचा टेंकर येणार होता. पाणी भरायला हवं म्हणून पळाल्या.
राघो तालुक्यात बाजाराला गेला, सकाळपासून त्याची आई मातीची भांडी अनं मडकी विकायला बसली होती, आता राघो तिकडे जाणार आणि  आईला घरी जेवण बनवायला पाठवून स्वतः त्या विकायला बसणार!
मन्या सकाळी रानात चरायला सोडलेली गुरं बघायला गेला.
भिड्या घरी जाऊन टीव्ही लावून अर्णव गोस्वामी आज काय बोलतोय हे बघत बसला.
आपट्या संघाच्या शाळेतजाऊन आज कोण देशद्रोही भेटलं आता यांना कसं संपवायचं याचं नियोजन करू लागला.
चिंध्या मंदिरात गेला आज त्याचे  वडील त्याला सत्यनारायण पूजा कशी घालावी हे शिकविणार होतें.

- प्रमोद शिंदे  मुंबई (9967013336)
आवडल्यास नक्की शेअर करा.