Wednesday, January 1, 2025

ती बाई होती म्हणून...

*ती बाई होती म्हणून....*

ती बाई होती म्हणून देश पेटला नाही,
जर का गाय असती तर, देश पेटला असता!
गल्लीतला सो कोल्ड हिंदू नेता चेतला असता!
भगवे झेंडे घेवून रस्त्यावर उतरला असता!
धर्म रक्षणासाठी दोन चार पुतळे जाळले असतें,
काहींच्या फोटोला चपलाचे हार घातले असतें, 
जय हिंदुराष्ट्र म्हणत किंचाळला असता, ओरडला असता!
पण आता ते होणार नाही
कारण ती बाई होती,
गाय असती तर देश पेटला असता!

इथे बाईला बाप्याच्या गर्दीत नागवं फिरवणं शूरपणाचं मेडल ठरतं!
इथे पोरीला मंदिरातच पुजाऱ्याने बलात्कार करणं पुण्य समजलं जातं!
इथे बलात्काऱ्यानां तुरुंगातून सन्मानाने बाहेर काढून औक्षण केलं जातं!
बलात्कार हे वीर योध्यासाठी राजकीय हत्यार मानलं जातं!
त्या देशात आणखीन काय होणार!
कारण ती फक्त बाई होती, 
गाय असती तर देश पेटला असता!

कुठे गाय कापली म्हणून रान उठवणारे गांडू!
कुठे गायीचं मांस भेटलं म्हणून हत्याकांड घडवणारे भडवे!
ब्रिजभूषण ला पाठीशी घालणारे लंडचडे!
बाईला विधवा म्हणून हिणवणारे चौकीदार!
गांडी खालची लाल दिव्याची गाडी अन तुरुंगाची बेडी वाचविण्यासाठी कमरेचं सोडून देणारे नेते !
त्या देशात आणखीन काय होणार,
ती फक्त बाई होती, 
गाय असती तर देश नक्कीच पेटला असता!

सैतानाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी रात्रीचं कोर्ट चालवणारी 
सन्यासाला ट्रायलच्या नावाखाली तुरुंगात खितपत ठेवणारी,
चांडाळ न्यायव्यवस्था,
पत्रकारितेचा धंदा करून स्वतः चं शील  विकणारी पत्रकारिता!
लोकशाहीला बाजारात बसवून पोटाची  खळगी भरणारी निवडणूक व्यवस्था,
त्या देशात आणखीन काय होणार,
ती फक्त बाई होती,
गाय असती नां तर देश पेटला असता,
देश पेटला असता!

*प्रमोद शिंदे*
*9967013336*