तर महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी भरडला जाईल.
महाराष्ट्रावर प्रेम करणारे याकडे लक्ष देतील का?
मुद्दा आहे या भागात वितरित होणाऱ्या पिशवी बंद दुधाचा !
मुंबई आणि परिसरात प्रामूख्याने गोकूळ, महानंदा आणि आरे या महाराष्ट्रातील प्रमूख दुग्धव्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे पिशवी बंद दुध वितरित होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घराघरातून गोळा केलेले दुध गोकुळ, महानंदा आणि आरे या कंपन्यांच्या मदतीने महाराष्ट्रभर वितरित केले जाते. यातून या दुध उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळत असतात.
काही वर्षापूर्वी गुजरातमधील अमूल या दुग्धव्यवसाय करणाऱ्या कंपनीने महाराष्ट्रात प्रवेश केला. परंतू तो अगदी अत्यल्प होता. मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी अमुल दुध नाकारले. फक्त काही गुजराती भाषिक नागरिकांनी आपले राज्य प्रेम दाखवून अमूल दुध घ्यायला सुरवात केली. तेही प्रमाण अगदी अत्यल्प होत. परंतु आता या अमूल कंपनीने ३ ते चार महिन्यापासून कुटील खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे. यात स्थानिक आणि वरच्या स्थरातील राजकारणी सामिल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजारातून हळूहळू गोकूळ, महानंदा आणि आरे दुध कमी करून ग्राहकांच्या माथी अमूल दुध मारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
३ महिन्यापूर्वी माझ्या घरी येणारे महानंदा दुध अचानक पणे बंद करून त्याजागेवर अमुल दुध टाकले गेले. आम्हाला वाटले आज चुकून झाले असावे, म्हणून आम्ही शांत राहिलो, परंतू दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी परत तेच झाले. मग तिसऱ्या दिवशी मि वितरकाला याचा जाब विचारला, त्यावर त्याने सांगितले कि , महानंदा बंद झाले, यावर मि म्हटले, "मग गोकूळ चे देत जा". त्यावर तो वितरक म्हणाला ते आपल्याकडे येत नाही , मि म्हटले ठिक असे म्हणून आपल्या कामासाठी गेलो. त्या दिवशी मि पूर्ण दिवस जवळपास च्या तसेच इतर दुकानात चौकशी केली. अगदी गोकूळ, महानंदा यांची संकेतस्थळ तपासली. परंतु कोठेही महानंदा किंव्हा गोकूळ बंद झाल्याचे ऐकले किंव्हा वाचले नाही.
मग मि दुसऱ्या दिवशी याचा जाब वितरकला विचारला, तर या वेळेस त्याने सांगितले कि, महानंदा मागे कमी कमिशन मिळते, यावर मि म्हटले, अगोदरच १९ रुपयांची ची पिशवी तुम्ही २० रुपायात देता. शिवाय प्रत्येक पिशवी मागे तुमचे मार्जीन वेगळे घेता, मग अजून किती हवय? उद्या पासून मला महानंदा आणून द्या अन्यथा दूध बंद करा. यावर त्याने होकार देत, माझ्याकडे महानंदा दुध पिशवी द्यायला सुरुवात केली.
बांधवांनो आज याची आठवण यासाठी झाली की आज त्या वितरकाने पून्हा तेच केले आणि मि अमूल घ्यायचे नाकारले आणि पून्हा तिच चर्चा आम्हा दोघात झाली.
याबद्दलचा इतिहास असा कि, महानंद जेव्हा भरात होती तेंव्हा विक्री साडेआठ लाखावर गेली होती. त्यावेळी खप वाढविण्यासाठी गुजरातमधे पाय रोवण्याचे प्रयत्न व्यवस्थापनाने केले होते. पण हल्ले करून दगडफेक करून हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. त्याच अमूलने आता महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे, अमूलने वसईजवळ डेरी काढली तर शरद पवारांसह अनेक राजकारणी हजर होते, आता विदर्भात मोठी डेरी काढण्याचे घाटत असून गडकरींनी त्याचे स्वागत केले आहे.
बांधवानो, शेती करणारा शेतकरी सरकारच्या खाजगी करणाच्या धोरणांमुळे रसातळाला जावून आत्महत्या करत आहे. आता हाच कुटील खेळ अमूल सोबत मिळून काही राजकारणी करत असतील तर, उद्या दुध उत्पादक शेतकरी ही आत्महत्या करताना दिसेल. या कुटील खेळात महानंदा आणि गोकूळ कंपन्याचे अधिकारी ही वरच्या कमाईसाठी सामिल असण्याची शक्यता आहे.
बांधवानो आपण जर खरच महाराष्ट्रावर प्रेम करत असू आणि आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाने जगू द्यायचे असेल. तर आपल्याला आपल्या शेतकरी बांधवाच्या हातात चार पैसे मिळतील, त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटतील, या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी या अमूल सारख्या उद्योगपतीचा कुटील खेळ, आपल्या राजकारण्यांचे गुजरात प्रेम आणि स्थानिक अधिकारी वर्गाचा भ्रष्टाचार पायदळी तुडवावा लागेल. मुंबई आणि परिसरात स्थलांतरित गुजराती बांधव ज्या पद्धतीने आपल्या राज्यावर प्रेम करून त्या राज्यातील व्यावसायिकाना सहकार्य करतात त्याप्रमाणेच आपल्यालाही आपल्या राज्यावर प्रेम व्यक्त करताना आपल्या राज्यातील व्यावसायिकाना पाठिंबा द्यावा लागेल. आपले जर खरे महाराष्ट्रावर प्रेम असेल आणि आपले दूध उत्पादक शेतकरी आनंदाने जगावेत असे वाटत असेल तर आज पासून आपण महाराष्ट्रात उत्पादन होणारे कोणत्याही कंपनीचे दुध घ्या, यात गोकूळ, महानंदा, आरे आणि इतर अनेक पर्याय आहेत.

बांधवानो लक्षात ठेवा, आपला शेतकरी जगला तरच भविष्यात आपण आनंदाने जगू.
धन्यवाद!
प्रमोद शिंदे
(९९६७०१३३३६)
"शेतकरी माझा भाऊ"
धन्यवाद!
प्रमोद शिंदे
(९९६७०१३३३६)
"शेतकरी माझा भाऊ"
No comments:
Post a Comment