केंद्र आणि राज्य सरकारला हा असला निर्णय घ्यावा लागतोय हे आपलं दुर्दैव आहे, पण निर्णय चूक असेही म्हणता येतं नाही.
प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या चौकडीच्या कार्यकुशलतेने अगोदरच GDP हा 4% वर आला होता, यात कोरोनो मूळे तो 1.5% वर आला.
देशाचा आर्थिक कणा असलेल्या रिसर्व बँकेत पैसे नाहीत,
वर्षभराअगोदर मोदींनी रिसर्व बँकेतून 1.76 लाख करोड काढून घेतले, देश चालवायला की कशासाठी कुणास ठाऊक?
उद्योजकांच्या लबाडीच्या 68000 करोड वर पाणी सोडलं, जप्त केलेल्या संपत्ती ची काही माहिती नाही.(जप्त केले की नाही हेही माहिती नाही.)
नोटबंदी आणि GST मूळे कंपन्या, छोटे उद्द्योग बंद.
सरकारी उद्योग खाजगी व्यापाऱ्यांना चालवायला दिले.
हिंदू मुस्लिम च्या राजकारणात देशाकडे दुर्लक्ष, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलीय.
या मनमानी कारभारामुळे आतापर्यंत 3 गव्हर्नर यांनी राजीनामा दिलाय.
त्यातलेच एक अर्थतज्ञ रघुरामन राजन आणि इतर अर्थशास्त्राचे अभ्यासक असे सांगत आहेत, की देश आर्थिक संकटात आहे.
राज्यांचे GST चे पैसे परत करायला मोदीजी कडे पैसा नाहीय.
आपल्या महाराष्ट्राचे 15558 करोड केंद्राकडे अडकले आहेत.
अशावेळेस दुसरा एखादा मार्ग आहे का? माहिती नाही.
पण मोदीजी त्यांची चौकडी या सर्वांच्या कर्माची फळं देशाला म्हणजेच देशाच्या प्रत्येक नागरिकाला भोगावी लागत आहेत.
कोण जाणे भविष्यात अजून काय असेल?
- प्रमोद शिंदे
मुंबई
No comments:
Post a Comment