Tuesday, November 6, 2018

सम्राट अशोकाचा भारत घडवूया

*सम्राट अशोकाचा भारत घडवूया*
- प्रमोद शिंदे (9967013336)

आम्ही बाबासाहेब यांचे पुतळे मागितले.
त्यांनी दिले, आम्ही खुश,
सोबत त्यांनी देशाची समानता मातीत गाडणाऱ्या  मनू आणि परशुरामाचे सुद्धा पुतळे दिले.

आम्ही शिवरायांचे पुतळे मागितले
त्यांनी दिले, आम्ही खुश
सोबत त्यांनी शिवरायांनाचं बदनाम करणाऱ्या दादोजी आणि रामदास यांचे सुद्धा पुतळे दिले.

आम्ही नीतिवान संभाजी राजांचे पुतळे मागितले.
त्यांनी दिले, आम्ही खुश
सोबत त्यांनी मस्तानीचा हिरो  बाजीरावाचे पुतळे दिले.

आम्ही चैत्यभूमीचा विकास मागितला.
त्यांनी केला, आम्ही खूश त्यांनी बाजूलाच गणेश विसर्जन घाट ही सजवला.

आम्ही गल्लीत बुद्धविहार  मागितले,
त्यांनी दिले, आम्ही खुश,
त्यांनी दुपट्टीने गल्लीत साई आणि गणेशाची मंदिरं बांधली.

आम्ही शिवस्मारक, आंबेडकर स्मारक मागितले.
ते देतील, आम्ही खुश होवू
परंतु सोबत ते आम्हांला परशुराम, मनू, आणि राम मंदिर देतील.

आम्ही पुतळे मागितले, त्यांनी धर्मांधता दिली.
आम्ही कौटुंबिक मालिका मागितल्या.
त्यांनी चमत्कार दाखविले.

आम्ही आमचा हक्क मागितला, त्यांनी जातीजातीत भांडणं लावली.

आम्ही रायगडावर लाखोने जमून घोषणा दिल्यात.
त्यांनी आम्हांला अनवाणी शिर्डीला चालत नेलं.

आम्ही चैत्तभूमी, दीक्षाभूमी वर लाखोने रांगा लावल्या.
त्यांनी आम्हांला लालबागला लाथा खायला रांगेत उभे केलं.

आम्ही कुठे चुकलो हे कधीच नाही समजलं, त्यांना समजलं त्यांनी आमच्या नेत्याच्या बुडाखाली लाल दिवा दिला,
आम्ही खुश,  त्यांनी आम्हांला कधी वानर बनवून, त्यांच्या मागे घोषणा द्यायला लावलं, आम्हाला हेही कळलं नाही.

आपण लांडग्यांच शेपूट धरलं, महामंडळ मागितलं त्यांनी आपलं चळवळी चं केंद्र वसतिगृह आणि भवनच उध्वस्त केलं.

आता बस करा मागणे.
मागणारे हात खाली करा, देणारे हात वर करा.
विचार देऊया, कार्य देऊया , शिक्षण देऊया, प्रेरणा देऊया.

ते बाबासाहेब, फुले, शाहू, अण्णा भाऊ यांचा विरोध करतात म्हणून त्यांचा विरोध करू नका.
त्यांना बाबासाहेब, फुले शाहू अण्णा भाऊ समजून सांगा.
ते ऐकणार नाहीत, तरीही आपण सांगत राहुयात.

त्यांनी त्यांचाच बुद्ध नाकाराला तरीही आपण संत तुकाराम स्वीकारून, त्यांना बहिणाई च्या  शब्दातुन तुकारामांच्या वाणीतला बुद्ध सांगूया.

पंजाब मधून संत नामदेवाना परत आपल्या घरी आणून वारकऱ्यांमध्ये पेरूया.

गल्लीतल्या भैया कडे डोळे वटारून बघण्यापेक्षा गल्लीतले दारूचे धंदे बंद करूया.

गल्लीतल्या नेत्या मागे बीअर आणि चिकन साठी फिरणे बंद करून आपल्या घरी बोलावू, आपली परिस्थिती दाखवू, माझा बाप माझ्यासाठी कसा राबराब राबतोय, आई कशी मर मर मरते, हे दाखवू,

ते जय शिवराय म्हणतील तर त्यांना रायगडावर चल म्हणा, मदारी मेहतर ची कबर आणि मशीदित वसलेला जगदीश्वर बघ म्हणा.

ते जय महाराष्ट्र म्हणतील तर आपण त्यांना त्यांचाच संस्थापक बाळासाहेबानीही स्वीकारलेला प्रबोधनकार सांगूया.

ते जय मनसे म्हणतील,आपण  त्यांना नरेंद्र दाभोळकर यांच्या पाठीशी उभे राहून बुवा बाबांना झोडपनारा राज दाखवू.

ते जय भीम म्हणत तुम्हाला गोयंका चा बंद डोळ्यांचा ध्यानस्थ बुद्ध दाखवतील, आपण त्यांना बाबासाहेबांच्या कुंचल्यातला उघड्या डोळ्यांचा कृतीशील बुद्ध दाखवू.

ते भारताला हिंदुस्थान म्हणतील, आपण भारताला भारतच म्हणूया,

ते आरक्षण बंद करा म्हणतील, त्यांना म्हणूया, त्या टीव्ही च्या चौकोनातून बाहेर ये, ते माझी खरी परिस्थिती दाखवणार नाहीत, 4 दिवस माझ्या गावी राहायला ये, रहा माझ्या सोबत, जग माझ्यासारखं.

कधीतरी, तुम्ही भाकरी साठी नोकरी मागाल, तर ते जयंती मोठी करू म्हणतील,

तुम्ही पाणी मागाल तर, गणपती ची मोठी मूर्ती आणू म्हणतील,

तुम्ही चांगले शिक्षण मागाल तर ते  देवीला डीजे लावून देतो म्हणतील, नाचा खुशाल.

आपण मागत राहू, ते दुपटीने देतील, दुसऱ्या बाजूने आपले जगण्याचे श्वास रोखतील, प्रगती चे दोरखंडच कापतील.

आतां आपण मागणारे न होता देणारे होऊया,
प्रमोद शिंदे  सांगतो ही बुद्ध वाणी, मी म्हणून न करता, बुद्धीच्या जोरावर तपासून अमलात आणूया,
पुन्हा एकदा अशोकाचा भारत घडवूया.
शिव शंभू फुले शाहू आंबेडकर, अण्णा भाऊ यांचा वारसा चालवूया.
बुद्ध नामदेव कबीर तुकाराम भगतसिंग सोबत क्रांतीचे गीत गाऊया.
पुन्हा एकदा अशोकाचा भारत घडवूया.
पटलं असेल तर पुढे इतरांना हि पाठवू या.
पुन्हा एकदा अशोकाचा भारत घडवूया.
*-प्रमोद शिंदे (9967013336)*
*भारत संस्कार आंदोलन*

No comments:

Post a Comment