Wednesday, October 5, 2022

जल जंगल जमीन आणि आदिवासी

*जल, जंगल, जमीन आणि आदिवासी*
विचार करा एखादा परका व्यक्ती तुमच्या घरात पाहुणा म्हणून येतो, तुम्ही त्याचा पाहुणचार करता, काही कालावधी नंतर तो व्यावसायिक दृष्टीने घरात बदल करायला लागतो, घराचं मूळ स्वरूपच विद्रुप करतो, त्यामुळे तुमच्या जगण्याचे प्रश्न उभे राहतात, तदनंतरही तुम्ही शांत बसाल का? बंड करालंच ना?
अगदी आतापर्यंत निर्माण झालेल्या भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ सगळ्या भाषेतील चित्रपट पाहिल्यास आपण पाहिले आहे की आपल्या पूर्वजांच्या जल, जमीन, संपत्तीचे रक्षण करणारा आपल्यासाठी हिरो असतो आणि पुढे हेच चित्रपट सर्वात जास्त पैसा कमावणारे ठरतात.
हे जर सर्वमान्य सत्य असेल तर हजारो वर्षांपासून जंगलात राहणारा पिढ्यानं पिढ्या ज्यांनी जल, जंगल, जमीन यास देवता मानून पूजली व जोपासली, त्या वसुंधरेला वाचविण्यासाठी हा आदिवासी बंड करतो तर तो व्हिलेन कसा ठरू शकतो?
मला माहिताय मी हे लिहताना मोठी रिस्क घेतोय, कारण ज्यांनी ज्यांनी त्या बाजूने लिहण्याचा बोलण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना या भांडवलदारांच्या हातातील सरकारने शहरी नक्षली म्हणून तुरुंगात डांबलंय. तरीही मी लिहणार, कारण यावर बोलणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
आता पर्यंत जरी माझ्या भेटीस कोणी असा नक्षलवादी आला नाही तरी लिखाणासाठी भारतातील काही राज्यातील जंगलात फिरत असताना, स्थानिक आदिवासीसोबत चर्चा करताना हे नक्षलवादी कोण्या रॉबिनहूड पेक्षा कमी नाहीत हेच जाणविले. सगळ्यांच्या मनात यांच्याबद्दल एक आदराची भावना या लोकांमध्ये दिसून आली. 
त्यांना नक्षलवादी म्हणून घडण्यासाठी तसें अनेक जुने मुद्दे आहेत, पण सध्या दोन मुद्दे मला इथे मांडायला हवेत असे मला वाटतेय कारण हा विकलेला मीडिया हे दाखवणार नाही.
1. मध्य प्रदेशातील कुनो नेशनल पार्कमध्ये मोदीजी नी 8 चिते आणून वसवले, त्यानंतर आपल्याला एवढंच दिसलं किंबहुना एवढंच दाखवलं गेलं. पण त्यासाठी या जंगलातील 22 गावातील हजारो कुटुंबाना विस्थापित व्हावं लागलं, याबद्दल कुठेच बातमी नाही. या आदिवासीना आपलं पिढ्यानं पिढ्याचं जल, जंगल, जमीन सोडून जावं लागलं. 
हीच गत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 25 खाणीसाठी खोदकाम आणि जंगल तोड सुरू केले केलेली आहे, त्यासाठी सुध्दा स्थानिक आदिवासी कुटुंबाना सैन्य बळाचा वापर करीत विस्थापित करण्याचे कार्य सुरू झालंय.
हेच गेली अनेक वर्ष सुरू आहे, काँगेस असो की भाजपा यांनी आलिपाळीने सुरू ठेवलंय. 
यावर माझे अनेक मित्र म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हाती शस्त्र घेणं चुकीचं आहे. शस्त्र न घेता लढा म्हणावं, हाच प्रश्न मी तेथील स्थानिकांना विचारला यावर तेथील स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की पाकिस्थान व चिन हे बाहेरचे आहेत त्यांच्या विरुद्ध लढताना शस्त्र वापरता हे ठीक आहे पण मग घरच्या लढाईत पोलीस बळ व सैन्य बळ तसेच शस्त्रात्रे वापरले जातात का?
हा लढा आमच्या जल जंगल जमीन हीं साधन संपत्ती वाचविण्यासाठी आहे, आम्ही निसर्गाला पूजतो, आमचे देव आहेत हे, आमच्या हातून हेच गेले तर आम्हाला सुध्दा तुमच्या शहरात पोटासाठी भीक मागावी लागेल. यासाठी आम्ही लढतोय तर यावर आमच्यावर गोळ्या झाडणारे आम्हाला शस्त्र का घेता असे म्हणतात.
आमची 750 कुळं जगभर आहेत, आम्ही इथले मूळनिवासी आहोत.
आमचा मूळ लिंगो जंगो आम्ही त्यास पूजतो, त्याचा फोटो मी सोबत देत आहे (योनी, अर्ध शिष्न, आणि बाहेर पडणारे शुक्राणू असावेत.)  हे प्रकृती निर्मितीचे साधन तोच आमचा देव आहे."
मी नीट पाहिले तर ते थोडे बहुत त्रिशूल सारखे दिसते, त्यावरूनच त्रिशूलाची निर्मिती झाली असावी, असे वाटावे, कारण हे आदिवासी महादेवाला बुढाबाबा तर पार्वती ला महामाया म्हणतात.
आता शेवटी प्रश्न राहतो हे नक्षलवादी, दहशतवादी आणि क्रूर आहेत का?
हाच प्रश्न त्यांच्या घरात राहून स्वतःची प्रगती करत पुरस्कार घेतलेल्या प्रकाश आमटे यांना विचारा!
त्यांना कधी तरी विचारा, की हे आदिवासी का करतायेत हे ? तुम्हाला काही त्रास दितायेत का?

- प्रमोद शिंदे
9967013336
(जास्तीस जास्त फॉरवर्ड करा.)

Tuesday, October 4, 2022

भाजपचे विकृत राजकारण

शिंदे गटातील आमदार खासदारानो,
नुकतीच ओवळा-माजिवाडा मतदारसंघाच्या जागेवरून एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात वाद झाल्याची बातमी कानावर आली, मुळात प्रताप सरनाईक यांचा हा मतदारसंघ पण त्यांनी भाजपा साठी सोडवा असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरला. यावर प्रताप सरनाईक यांनी विरोध केला असता, त्यांच्यावर थांबवलेली ED ची कारवाई पून्हा सुरू केली गेली. (भाजपाचा मेन स्त्रीम मीडिया ही बातमी दाखवणार नाही.)
यातून दोन मुद्दे प्रकर्षाने समोर आलेत ते म्हणजे एकतर हे सरकार  अनधिकृत आहे आणि हे कोसळणार हे भाजपच्या सर्वांना माहिती आहे म्हणून भाजपने आपली मोर्चे बांधणी सुरू केलीय. दुसरं म्हणजे शिंदे गटातील आमदारांनी खाली माना घालून मुकाट्यानं गप्प बसावं नाहीतर गाठ भाजपाशी आहे, हीं धमकीच भाजपने दिलीय.
आता शिंदे गटातील आमदार आणि खासदारानो तुम्हाला खालील तीन सत्य गोष्टी सांगतो, त्या मान्य आहेत का कळवा.
1. तुम्ही तुमचा मतदार संघ भाजपच्या भाजपासाठी सोडण्यास तयार आहात का? ( प्रताप सरनाईक प्रकरण )
2. भाजपाने तुम्हाला मतदारसंघ दिला तर तुम्ही भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यास तयार आहात का? (उदा. 2019 ची निवडणूक... महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष )
3. जरी धोक्याने तुम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आणि शिवसेना शिंदे गट निवडणूकित आला तरी पक्ष आणि चिन्ह तुमचं पण उमेदवार भाजपचा हे मान्य कराल का? (उदा. 2019ची निवडणूक... नागपूर मतदार संघ, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष)
ह्या सर्व चाली भाजपचा विकृत मेंदू खेळतो आहे, आता तुम्ही बकरे आहात, नमुन राहा नाहीतर खाल्ले जाल.
आत्ताच तुमच्या एकनाथ शिंदे यांना बोलताना फडणवीस माईक हातातून काढून घेतात तर गिरीश महाजन तोंडावर पेपर ठेवून एकनाथ शिंदे यांनी काय बोलावं हे सांगत असतात.
तुमची स्वतःची भाषा लायकी किंवा प्रतिष्ठा काही आहे की नाही.
प्रमोद शिंदे
9967013336
(जास्तीस जास्त फॉरवर्ड करा )

रावण रावण आणि रावण

"रावण रावण आणि रावण"
मित्रांनो दसरा आला की पून्हा एकदा रावण विषयावर चर्चा सुरू झालीय, त्यातच काही विकृत मेंदूनी आदिपुरुष नामक चित्रपट प्रदर्शित करून रावणाला यवनी रूप देण्याचा खोडसाळ प्रयत्न केलाय.
काही महिन्यांपूर्वी मी यावर लिखाण केले होतें, मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील आठनेर गावांत गेल्यावर तेथील गोंड समाजातील लोकं आणि त्यांचे रावणाशी नाते यावर मी लिहलं होतं, तिकडे होळीच्या दिवशी मेघनाथ महोत्सव साजरा करतात, असे लिहले होतें आता याचं समर्थन करणारे पुरावे मला आपल्या महाराष्ट्रातचं सापडलेत, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यात, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात, तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात फिरताना व तेथील आदिवासी समाजाशी बोलताना हे पुरावे सापडतात.
यात हेही परत एकदा सर्वार्थाने मान्य झाले की आदिवासी हा स्वतःला हिंदू समजतंच नाही, त्यांचा मूळ धर्म गोंड आहे, त्यात त्यांच्या त्यांच्या अनेक जमाती आहे.
त्यातीलच गोंड प्रधान समाज रावणाला स्वतःचा मूळ पुरुष मानतो, यातील मोठा सुशिक्षित वर्ग सध्या रावण दहनाला विरोध करतोय. त्यांच्या मते आर्याच्या आक्रमणानंतर रावण पुत्र म्येगनादो (मेघनाथ हा अपब्रँश आहे.) याने आर्य नेता इंद्र याला हरवले म्हणून यास इंद्रजित हे नाव पडले. आजही साक्री तालुक्यातील बारीपाडा या गावात राहणाऱ्या मावची, कुकणी आणि भिल्ल हा समाज हनुमानाला आपला मूळ पुरुष मानतो व फक्त त्याचीच पूजा करतो, त्यांच्या मते आमच्या या डोंगरात सगळ्या प्रकारच्या औषधी सापडतात. तर अहिल्या शिळा देखील आमच्या या जंगलात आहे, जवळच 4 किलोमीटर वर गाव आहे, वाल्मिकी हा मूळ याच भागातला असल्याचे सांगितले जाते, अगदी नाशिक मध्ये गोदावरी खोऱ्यात सीता कुटी असल्याचे दिसते.
यासर्व पुराव्यावरून असेच दिसते की मुंड समाजातील राम, व गोंड प्रधान समाजातील रावण यांचा कुठेहीं श्रीलंकेशी संबंध नाहीय, तर ते इथलेच म्हणजेच महाराष्ट्र,  मध्य प्रदेश छत्तीसगड, बिहार, झारखंड या भागातील आहे, काही इतिहासकार यांच्या मतानुसार वाल्मिकी रामायण इ. स. 5 व्या शतकात लिहले गेलेय व रावणाची लंका हीं मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात आहे.
तर मुंड समाजातील रामाने आर्य नेता परशु याचा कानपुर येथे पराभव केला, तर रावण पुत्र म्येगनादो याने इंद्रजित चा पराभव केला. हे खरे क्रांतिकारी होतें जे आर्य आक्रमणाविरुद्ध लढत राहिले.
शेवटी गडचिरोली शहरात राहत असलेल्या एका गोंड प्रधान समाजातील शहरीकरण झालेल्या एका महिलेशी आजच्या कथित राम रावण वैरावर मी चर्चा केली अशी होती.
मी : तू गोंड प्रधान?
ती : हो
मी : तुमचा रावणाचा काय संबंध?
ती : आमचा कुळ दैवत, म्हणजेच मूळ पूर्वज, पण आम्ही त्यांना नाही मानत? (अगदी शरमेने सांगत होती.)
मी : का?
ती : त्याने केलं ते चूक होतं?
मी : काय चुकलं त्याचं?
ती : सीतेला पळवायला नको होतं.
मी : मग राम आणि लक्ष्मण यांनी केलं ते चांगलं होतं का? त्याच्या बहिणीचे म्हणजे शूर्पनखेंचे कान आणि नाकं कापले, ते बरोबर होतं का?
ती : तिने पण चूक केली ना?
मी : काय चूक केली? आपलं लक्ष्मनावर प्रेम जडलंय आणि ते तिने व्यक्त केलं, ते चूक आहे का?
ती : ते आज चालतं, पूर्वी नाही ना?
मी : असं कसं, परत त्या काळात स्त्रीला अधिकार होतें, यातूनच स्वयंवर निर्माण झाले ना, स्त्रियांना नवरा निवडायचा अधिकार होता.
उलट राम लक्ष्मनाने चूक केली, एखाद्याने प्रपोस केल्यावर सरळ नकार देता येवू शकत होता, तर नाक कान कापून तिला विद्रुप केले तर रावण सुध्दा हे करू शकत होता, सीतेचे हात पाय कान नाकं कापू शकून बदला घेवू शकत होता, पण त्याने सीतेला स्पर्श न करता पळवून आणले सन्मानाने ठेवले, राम लक्ष्मण येतील तिला शोधत व माफी मागतील याच उद्देशाने, मग इथे कोण चुकीचा!
ती : हम्म (शांत)
मी : नको त्या चुकीच्या कथावर विश्वास ठेवू नका, या सगळ्या खोट्या कथा आहेत, तुमच्या पूर्वज्यांचा अभिमान बाळगा, त्यांच्या शौर्याचे धडे पोरांना शिकवा.
ती : शांत (जाताना माझ्यासोबत फोटो घेण्याचा आग्रह केला, आम्ही तो काढला.)
- प्रमोद शिंदे
9967013336
(जास्तीत जास्त फॉरवर्ड करा.)