"रावण रावण आणि रावण"
मित्रांनो दसरा आला की पून्हा एकदा रावण विषयावर चर्चा सुरू झालीय, त्यातच काही विकृत मेंदूनी आदिपुरुष नामक चित्रपट प्रदर्शित करून रावणाला यवनी रूप देण्याचा खोडसाळ प्रयत्न केलाय.
काही महिन्यांपूर्वी मी यावर लिखाण केले होतें, मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील आठनेर गावांत गेल्यावर तेथील गोंड समाजातील लोकं आणि त्यांचे रावणाशी नाते यावर मी लिहलं होतं, तिकडे होळीच्या दिवशी मेघनाथ महोत्सव साजरा करतात, असे लिहले होतें आता याचं समर्थन करणारे पुरावे मला आपल्या महाराष्ट्रातचं सापडलेत, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यात, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात, तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात फिरताना व तेथील आदिवासी समाजाशी बोलताना हे पुरावे सापडतात.
यात हेही परत एकदा सर्वार्थाने मान्य झाले की आदिवासी हा स्वतःला हिंदू समजतंच नाही, त्यांचा मूळ धर्म गोंड आहे, त्यात त्यांच्या त्यांच्या अनेक जमाती आहे.
त्यातीलच गोंड प्रधान समाज रावणाला स्वतःचा मूळ पुरुष मानतो, यातील मोठा सुशिक्षित वर्ग सध्या रावण दहनाला विरोध करतोय. त्यांच्या मते आर्याच्या आक्रमणानंतर रावण पुत्र म्येगनादो (मेघनाथ हा अपब्रँश आहे.) याने आर्य नेता इंद्र याला हरवले म्हणून यास इंद्रजित हे नाव पडले. आजही साक्री तालुक्यातील बारीपाडा या गावात राहणाऱ्या मावची, कुकणी आणि भिल्ल हा समाज हनुमानाला आपला मूळ पुरुष मानतो व फक्त त्याचीच पूजा करतो, त्यांच्या मते आमच्या या डोंगरात सगळ्या प्रकारच्या औषधी सापडतात. तर अहिल्या शिळा देखील आमच्या या जंगलात आहे, जवळच 4 किलोमीटर वर गाव आहे, वाल्मिकी हा मूळ याच भागातला असल्याचे सांगितले जाते, अगदी नाशिक मध्ये गोदावरी खोऱ्यात सीता कुटी असल्याचे दिसते.
यासर्व पुराव्यावरून असेच दिसते की मुंड समाजातील राम, व गोंड प्रधान समाजातील रावण यांचा कुठेहीं श्रीलंकेशी संबंध नाहीय, तर ते इथलेच म्हणजेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश छत्तीसगड, बिहार, झारखंड या भागातील आहे, काही इतिहासकार यांच्या मतानुसार वाल्मिकी रामायण इ. स. 5 व्या शतकात लिहले गेलेय व रावणाची लंका हीं मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात आहे.
तर मुंड समाजातील रामाने आर्य नेता परशु याचा कानपुर येथे पराभव केला, तर रावण पुत्र म्येगनादो याने इंद्रजित चा पराभव केला. हे खरे क्रांतिकारी होतें जे आर्य आक्रमणाविरुद्ध लढत राहिले.
शेवटी गडचिरोली शहरात राहत असलेल्या एका गोंड प्रधान समाजातील शहरीकरण झालेल्या एका महिलेशी आजच्या कथित राम रावण वैरावर मी चर्चा केली अशी होती.
मी : तू गोंड प्रधान?
ती : हो
मी : तुमचा रावणाचा काय संबंध?
ती : आमचा कुळ दैवत, म्हणजेच मूळ पूर्वज, पण आम्ही त्यांना नाही मानत? (अगदी शरमेने सांगत होती.)
मी : का?
ती : त्याने केलं ते चूक होतं?
मी : काय चुकलं त्याचं?
ती : सीतेला पळवायला नको होतं.
मी : मग राम आणि लक्ष्मण यांनी केलं ते चांगलं होतं का? त्याच्या बहिणीचे म्हणजे शूर्पनखेंचे कान आणि नाकं कापले, ते बरोबर होतं का?
ती : तिने पण चूक केली ना?
मी : काय चूक केली? आपलं लक्ष्मनावर प्रेम जडलंय आणि ते तिने व्यक्त केलं, ते चूक आहे का?
ती : ते आज चालतं, पूर्वी नाही ना?
मी : असं कसं, परत त्या काळात स्त्रीला अधिकार होतें, यातूनच स्वयंवर निर्माण झाले ना, स्त्रियांना नवरा निवडायचा अधिकार होता.
उलट राम लक्ष्मनाने चूक केली, एखाद्याने प्रपोस केल्यावर सरळ नकार देता येवू शकत होता, तर नाक कान कापून तिला विद्रुप केले तर रावण सुध्दा हे करू शकत होता, सीतेचे हात पाय कान नाकं कापू शकून बदला घेवू शकत होता, पण त्याने सीतेला स्पर्श न करता पळवून आणले सन्मानाने ठेवले, राम लक्ष्मण येतील तिला शोधत व माफी मागतील याच उद्देशाने, मग इथे कोण चुकीचा!
ती : हम्म (शांत)
मी : नको त्या चुकीच्या कथावर विश्वास ठेवू नका, या सगळ्या खोट्या कथा आहेत, तुमच्या पूर्वज्यांचा अभिमान बाळगा, त्यांच्या शौर्याचे धडे पोरांना शिकवा.
ती : शांत (जाताना माझ्यासोबत फोटो घेण्याचा आग्रह केला, आम्ही तो काढला.)
- प्रमोद शिंदे
9967013336
No comments:
Post a Comment