अगोदर महाराष्ट्रातील पुरोमागी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली. त्याच पद्धतीने आता जेष्ट पुरोगामी विचारवंत कलबुर्गी यांची हत्या, कलबुर्गी हे प्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक होते त्यांना साहित्य अकादमीसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत. भारतातील जवळपासच सर्वच भाषांमधून त्यांचे साहित्य अनुवादित झालेले आहेत. हिंदूत्ववादी विचार आणि संघटना यांच्या विरोधात ते विचार मा...ंडत असत. त्यामुळे विद्रोही लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. अशा क्रांतीकारी शहीदाला अभिवादन!! त्यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करताना मला मला येथे संत ज्ञानेश्वराची आठवण होते ते आपल्या अभंगातून म्हणत ..
देव ते काल्पित |
शास्त्र ते शाब्दिक |
पुराणे सकळीक |
बाष्कळीक || - संत ज्ञानेश्वर अर्थ : अगोदर आस्तिक आणि शास्त्राचे भक्त असणारे संत ज्ञानेश्वर हे संत नामदेवाच्या सहवासात आल्यानंतर देवाला कल्पित ,शास्त्राला शाब्दिक आणि पुराणाला बाष्कळ बडबड म्हणतात .तेंव्हा ब्रम्हवृंदाचे धाबे दणाणले . ब्राम्हण कुळातून एक विद्रोही तयार होतोय याची धास्ती निर्माण झाली . कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरतो म्हणून तत्कालीन संत ज्ञानेश्वरास जीवंत पुरले असावे ,आणि प्रचार केला असावा जीवंत समाधी घेतली .
असे म्हणने भक्तांच्या श्रद्धेला धक्का देणारे आहे पण नाईलाज आहे सत्य सांगावे लागते . (संदर्भ: "नामदेवे रचीला पाया" लेखक : गंगाधर गीते , पान न.41 )
कारण संत तुकाराम म्हणतात .
सत्य असत्यासी | मन केले ग्वाही | मानियले नाही | बहूमता ||
अशा या सत्य सांगण्या साठी शहीद होणार्या कलबुर्गी यान्ना विनम्र अभिवादन
-प्रमोद शिंदे
१ सप्टे. २०१५

No comments:
Post a Comment