Friday, August 5, 2016

माझ्या आंबेडकर भवन या लेखावरील प्रतिक्रियेची दखल

माझ्या लेखावरील प्रतिक्रियेची दखल....

२५ जुन च्या रात्री आंबेडकर भवन पाडण्यात आल्यानंतर काल २० जुलै रोजी मी एक लेख लिहला, त्यामुळे अनेकांनी मला फोन केले, त्यात अनेक गोष्टींवर चर्चा झाली, परंतू त्यातील सगळ्यांचा रोष मुख्यतः एकाच गोष्टीवर होता, तो म्हणजे तुम्ही आंबेडकर भवन पाडण्याचा विरोध करत नाहीत तसेच ते पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांच्या विरोधात काहीच बोलत नाही आहात. यावर माझे स्पष्ट मत असे आहे कि, आंबेडकर भवन पाडण्याला आमचा विरोध होता, आहे आणि कायम राहणार आहेच, पण पडद्याआड राहून कारस्थान करणाऱ्या छुप्या शत्रूवर आमचे लक्ष आहे. मि त्या लेखात स्पष्ट पणे मांडलेय, इंदू मिल च्या जागेवर डॉ. आंबेडकर स्मारक उभे राहण्याची वाट बघत असताना आंबेडकर भवन आणि सिध्दार्थ विहार पाडून आंबेडकरी चळवळ, त्याचा इतिहास आणि त्याची केंद्रे संपवली जात आहेत. मित्रांनो , या मागे एक मोठा सुपीक मेंदू कार्यरत आहे, हा सुपीक मेंदू वेळीच ओळखून ठेचायला हवा.
रत्नाकर गायकवाड यांच्याबद्दल आमचे असे आहे कि , कोण आहेत हे? महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त म्हणजेच सरकारी नोकर आहेत. प्रथम दर्शनी आंबेडकर भवन पाडण्यात हे दोषी आहेत हेच दिसून येते आहे म्हणून त्याबद्दल आम्ही आणि संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांना कधीही माफ करणार नाहीच . आपल्याला हेही समजून घ्यायला हवे कि, आंबेडकरी समाजाचे विचार केंद्र पाडण्याची हिम्मत राज्य सरकार च्या पाठिंब्या शिवाय कोणीही करणार नाही आणि आंबेडकर भवन पाडण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा रत्नाकर गायकवाड याना असणार हे नक्की आहे. यावर स्पष्टीकरण देताना काल विधानपरिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यानी जरी रत्नाकर गायकवाड हे राज्यपाल नियुक्त आहेत त्यांचा सरकार शी काहीही संबंध नाही असे सांगून सरकार यात कुठेच नाही हे दाखविण्याची नौटंकी केली असली तरी, राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे त्यांच्याच भाजप पक्षाचे तेलंगणामधील मोठे नेते आहेत, हेही माहिती असावे. तसेच राज्याचा माहीती आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात काय नाते असते हे राजकारणातील प्रत्येक जाणाकाराला माहीत असते, त्यामुळे फडणवीस यानी आपले उघडे पडलेले.......... झाकण्याचा प्रयत्न करू नये.काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजून एक सांगितले कि , प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यानी आंबेडकर भवनाच्या डेवलपमेंट चा प्लॅन द्यावा सरकार ती वास्तू पुन्हा बांधून देइल. आता यावर या दोन्ही बंधूची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
मित्रांनो, आपल्याला जर एखादा दगड येवून लागला तर आपण दगडाकडे बघून विवळत किती काळ बसणार ? आपल्याला लागलेल्या दगडापेक्षा तो दगड कोण मारतय याकडे कधी बघणार? दगड मारणारे हात तर कलम करायचेच आहेत पण आदेश देणारा मेंदू कधी ठेचणार ?
आपण गेल्या काही वर्षात आंबेडकरी चळवळीत झालेल्या घटना पाहू.
१. भाजप सरकार सत्तेवर येताच इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या आंबेडकर स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यात असलेले लंडन मधील घर जनतेसाठी खुले.
३. भाजप सरकार तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १२५ वी जयंती साजरी करण्याचे आदेश, १२५ रुपयांचे नाणे चलनात आले.
या सर्व गोष्टी मनाला सुख देणाऱ्या असल्या तरी या काही इतर गोष्टीही महत्वाच्या आहेत.
१. महाराष्ट्र अनिस चे नरेंद्र दाभोळकर यांची ४ वर्षापूर्वी हत्या, तपास अजून लागलेला नाही.
२ . आंबेडकरी कवी सचिन माळी याला नक्षलवादी म्हणून अटक
३. शिवशक्ती भिमशक्ती चा नारा देत आठवले शिवसेनेसोबत युतीत सामिल.
४ . ऐन निवडणुकी अगोदर आठवले शिवसेनेला दूर लोटत भाजपच्या मागे
५ . भाजप सरकार सत्तेवर येताच सरकारी अधिकाऱ्यांनी नोकरीत सामील होण्यापूर्वी घ्यावी "देवाची शपथ," महाराष्ट्र सरकार ने काढला आदेश .
६. रस्त्यावर मोर्चा, आंदोलन काढण्यास आणि सरकार विरुद्ध घोषणा देणाऱ्या विरूध्द पोलिसी कारवाई चे आदेश.
७. संविधानातील धर्मनिरपेक्ष काढून पंथ निरपेक्ष टाकण्याची मागणी.
८ . हैदराबाद मधील तरुण आंबेडकरी कार्यकर्ता रोहित वेमुला याची आत्महत्या, अजून तपास लागलेला नाही.
९ . मुंबईतील चळवळीचे केंद्र सिद्धार्थ विहार जेथे आंबेडकरी कार्यकर्ते घडले, ते पाडण्यात आले.
१० . कर्नाटकातील लेखक डॉ. कलबुर्गी यांची हत्या, अजून तपास लागलेला नाही.
११. महाराष्ट्रात गोविंद पानसरे यांची हत्या. कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये ते शुद्धीवर आलेले असताना त्याना मुंबईत हलवण्याचा फडणवीस यांचा वादग्रस्त निर्णय, मुंबईत येताच त्यांचा मृत्यू.
१२ . मुंबईतील आंबेडकर भवन पाडण्यात आले. प्रकाश आंबेडकर आणि राज्याचे माहीती आयुक्त चे रत्नाकर गायकवाड यांच्यात शितयुद्ध रंगले.
१३. रामदास आठवले यांची केंद्रिय राज्यमंत्री पदी नियुक्ती.
या सर्व घटना जर आपण बारकाईने पाहील्यास आपल्याला यात काहीतरी कारस्थान शिजत असल्याचा वास नक्कीच येइल. परंतु आपले भिम भक्त या गोष्टींचा विचार करत नाहीत. प्रत्येक घटनेला वेगवेगळ्या नजरेतून पाहतात, आणि प्रत्येक घटनेला भावनिक होत प्रतिक्रिया देतात.
असो पण आता आंबेडकरी योद्धा ने खऱ्या शत्रूच्या दिशेने पाऊल टाकले आहे. शिवराय ,फुले , शाहू आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याच्या प्रचार प्रसाराचे काम सुरू केलेले आहे. फक्त आपण सोबत येण्याची वाट पहात आहोत.
धन्यवाद
प्रमोद शिंदे
आंबेडकरी योद्धा
२१ जुलै २०१६

मावळ्या कधी होशील खरा मावळा?

मावळ्या कधी होशील खरा मावळा ?

काही दिवसांपूर्वी कर्जत मधील कोपर्डे येथील बलात्काराच्या घटनेने सध्या महाराष्ट्रात जे राजकारण पहायला मिळतय ते अगदी विकृत स्थरावर चालले आहे. या घटनेचा जेवढा वापर करून घेता येइल तेवढा प्रत्येक संघटना करताना दिसून येत आहे.
काहीजन तर विकृतिच्या इतक्या थराला गेलेत की , "आता बोला " अशीच बोलणी सुरू आहे. आमच्या लोकांनी केलेले बलात्कार होते. मग आता बोला तुमच्या लोकांनी केले त्याचे काय ?
अशी ही मागणी होत असताना तोंडात सरास दलित शब्द आनित आहेत. जेंव्हा एखाद्या समाजाला आपण दलित म्हणून हिणवत असतो, तेंव्हाच त्यांच्या डोक्यातील विकृती दिसून येत असते. दलित शब्द तोंडी येणे हिच विकृत मानसिकता आहे. ज्या पद्धतीने मराठा ही जात नाही त्याच पद्धतीने दलित ही सुद्धा जात नाही.
ज्यांना याची काडीचीही माहीती नाही तेच आज या दोन्ही समाजाचे स्वतः च नेते असल्याचे भासवून दोघांत भांडणे लावयचे कार्य करित आहेत. दोन्ही सामाजातील सुशिक्षित तरुणांना एकमेकांपासून तोडत आहेत.
ही विकृत चाल हजारो वर्षापासून कोण खेळतय हे आता प्रत्येकाला कळून चुकले आहे. तरिही काही स्वार्थी व्यक्ती सत्ता लालसेपोटी यांच्या चालीत खेळणे होवून बोंबा मारताना दिसत आहेत.
या सर्व प्रकरणातून कारस्थानी मेंदूला एका दगडात तीन पक्षी मारायचे आहेत.
१. आ. ह. साळूंखे , मा. म. देशमुख , पुरुषोत्तम खेडेकर , श्रिमंत कोकाटे आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रबोधना मुळे एकत्र आलेले महार मराठा आणि कुणबी मराठा तसेच या प्रबोधनामुळेच शिवराय, फुले, शाहू आणि डॉ. आंबेडकर यांना विचारांच्या एकाच प्रवाहात पाहणाऱ्या सुशिक्षित कुणबी मराठा आणि महार मराठा या दोन समाजामध्ये फुट पाडून एकमेकांमध्ये वैर निर्माण करायचे आहे.
२. या वैरामुळे दोन्ही समाज वेगळे करून त्यांच्या नेत्याला भाकरीचा तुकडा टाकून पाळीव प्राणी बनवून टाकायचे आहे. उठ म्हटले उठ , बस म्हटले कि बस, अशी अवस्था करून टाकायची. पुढे आपल्या हातातील मिडिया अस्त्राव्दारे हाच तुमचा नेता म्हणत डोक्यावर मारायचा आहे.
३. हे दोन्ही समाज लढत बसले कि, या दोन्ही समाजाचे मूळ प्रश्न बासनात गुंडाळून , त्यांच्या समोर खोटे प्रश्न उभे करायचे. याउपर आम्हीच तुमचे खरे मार्गदाता हे चित्र निर्माण करून सत्ता आणि संपती दोन्ही आपल्या हातात ठेवायचे.
महार मराठा समाजातील सुशिक्षित तरुणांनी अगदी प्रांजळपणे हे मान्य करायला हवे कि, ॲट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे. काही स्वार्थी नालायक या कायद्याचा आणि त्याची भीती याचा वापर पैसा वसूली साठी करत आहेत , यात गावातील पोलिस अधिकाऱ्यांचा वाटा ठरलेला असतो. गावातील भांडणातील एका महार मराठा व्यक्तिला तु तक्रार कर, तुला पैसे मिळवून देतो असे सांगायचे मग तो पैश्यांच्या लालसेने तक्रार करतो. दुसऱ्या बाजुला कुणबी मराठा समाजातील व्यक्तीला पोलिसांच्या मदतीने केस दाबण्यासाठी पैसे मागायचे. झाले मग घाबरून तोही पैसे देण्यासाठी तयार होतो. असे स्वार्थी नालायक नेते गावागावांत बिना काम धंदा करत बुलेट वर फिरताना दिसतात. मग त्याना अगोदरच एखादा अडाणी भाकरिच्या तुकड्यांना लाचार झालेला नेता आपल्या पक्षाचा पदाधिकारी नेमतो. त्याची सर्व कृत्ये पाठीशी घालतो. मग झाले हा गावतला रिकामटेकडा या पक्षाच्या नेत्यालाच आपला माणतो. यामुळे गावागावांत पक्ष ही पोहचला आणि पक्षसाठी खर्च करणारा बकराही मिळाला.
आपण आतापर्यंत झालेले कोणतेही हत्याकांड बघू , तिकडे सर्व प्रथम कोण उपस्थित असते, तसेच कोण याचा बागुलबुवा करते. एक तर रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते आणि दुसरे पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले समाजवादी, अगदी सध्याच्या कोपर्डे मधील घटनेतही अगोदर हेच दोघे पोहचले, पण जेंव्हा कळले कि, बलात्कारीत मुलगी कुणबी मराठा समाजातील आहे तर या दोघांनी तेथून पळ काढला. रिपब्लिकन पक्ष लपून बसला तर समाजवादी कुणबी मराठा नेत्याच्या घरात गेला.
जामखेड आणि शिरडी प्रकरणात जातीय अत्याचाराची बोंब ठोकणारे RPI आणि समाजवादी ह्या
प्रकरणातील सत्य बाहेर आल्यावर कुठे लपून बसले. आम्ही सुरवातीपासून सांगत आहोत प्रत्येक प्रकरणाला जातीय चष्म्यातून बघणे म्हणजे हे कोणीतरी करत असलेले विकृत राजकारण आहे.
हेच मी माझ्या कुणबी मराठा बांधवांना सांगेन, आपल्यातही अनेक रिकामटेकडे नेते जन्माला येत आहेत. जे सरळ एखाद्या समाजाला दलित म्हणून संबोधित आहेत. त्यांच्या डोक्यातील जातीय उच्चनिचता दिसून येते, तेंव्हाच त्यांच्या बुद्धी ची किव येते. कुणबी मराठा समाजातील तरुणांची माथी भडकवून त्यांना सामाजिक एकतेसाठी काम करणाऱ्या तसेच शिवराय, फुले, शाहू आणि डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यापासून दुर लोटायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची.
खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंब हत्याकांड आणि खर्डा येथील नितीन आगे हत्याकांड हे दोन्ही जातीय मानसिकतेतून झालेय हे अमान्य करण्यासारखे आहे का ? गावागावातून आपल्या कुणबी लोकांच्या डोक्यातून मराठा ही जातीय श्रेष्ठता गेलीय का ? अगोदर कुणबी मराठ्यांनी आपल्या डोक्यातील जात काढायला हवी. महार आणि कुणबी हे दोघे शिवरायांच्या सैन्यातील मराठे आहेत. शिवरायांचे मावळे आहेत. शिंदे, पाटील आणि चौहान दोन्ही समाजात आहेत. मग हा दलित हा मराठा हे कुठून आले ?
मित्रांनो खैरलांजी मधील बलात्कार आणि हत्या असो किंवा कोपर्डे मधील बलात्कार आणि हत्या असो दोन्हीही घटना अतिशय निच पातळीच्या माणूसला काळींबा फासणाऱ्या आहेत, दोन्ही गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच हवी. जेंव्हा आपण कोपर्डे च्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी मागणी करतो तेंव्हा खैरलांजी च्या गुन्हेगारांचे काय झाले हाही प्रश्न विचारायला हवा.
- प्रमोद शिंदे
आंबेडकरी योद्धा
9967013336

आंबेडकर भवन, प्रकाश आंबेडकर आणि भव्य मोर्चा

आंबेडकर भवन, प्रकाश आंबेडकर आणि भव्य मोर्चा

२५ जुन च्या रात्री आंबेडकर भवन पाडण्यात आल्यानंतर आज पर्यंत मला अनेकांनी विचारले तुम्ही या विषयावर लिहा. काहीनी तर लिहायलाच हवे असा आग्रह धरला. काहिनी तर तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही समर्थक आहात असेही लचके दिले. परंतू मि त्यांना "वेट ॲंड वॉच" थोडे दिवस थांबा आपोआपच कळेल असे उत्तर देत आलो. आंबेडकर भवन पाडल्यानंतर माझ्या डोक्यात काही प्रश्न उपस्थित झाले.
१.छगन भुजबळ यांच्यावर झालेले आरोप मान्य केले तरी त्यानीं केलेले एक कार्य अगदी वाखाणण्याजोगे आहे.
पुण्यातील क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांचे वास्तव्य असलेला फुले वाडा ऐतिहासिक वास्तू घोषित करून तो जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यावर ज्योतिराव फुले यांचे येथे वास्तव्य होते असे दर्शवणारा फलक लावण्यात आला.
जवळच सावित्रीमाई फुले यांचे स्मारक उभारण्यात आले. आज अनेक जन पुण्या
त गेले कि, या फुले वाड्यात जातात आणि सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांचे कार्य पाहून तिथेच भारावून जातात.
हीच गोष्ट मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या राजगृहाबाबत का घडत नाही?
याबाबत अनेक उत्तरे मिळाली. जशी कोर्टात केस आहे, वर पारशी राहत आहेत. खाली आनंदराज आंबेडकर राहत आहेत. काही दिवसांपूर्वी आनंदराज आंबेडकर याना " तुम्ही बाहेर असा फलक का लावत नाही कि, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. त्यावर त्यानी दिलेले उत्तर असे, " आम्हाला ही वास्तू अशीच ठेवायची आहे." त्यावर फलक लावल्यावर त्याची शोभा निघून जाईल. ऐतिहासिक वास्तूवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते असा फलक लावल्याने वास्तूची शोभा जाते. हे कारण आहे कि, तसा फलक लावल्यास रोजचे रोज सतत अनेक जन आंबेडकर प्रेमापायी येत राहतील , आणि यामुळे तुमच्या खाजगी आयुष्यात अडथळे येतील हे कारण आहे. डॉ. बाबासाहेब हे तुमची वैयक्तिक मालमत्ता नसून ते समाजाचे किंबहुना देशाचे नेते आहेत. आनंद आणि प्रकाश आंबेडकर यांनी असे जाहीर करावे कि, आमच्या कडे राहण्याची दुसरी व्यवस्था नाहीय, मग बघा संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्यासाठी कसा बाहेर पडतो ते, त्यानां हव्या त्या ठिकाणी हाच समाज एक वेळ कमी खाईल पण राहण्याची व्यवस्था करून देइल. त्यासाठी याबाबत स्वतः खासदार राहिलेले प्रकाश आंबेडकर यानी पुढाकार घ्यायला हवा, त्यांनी ठरवले तर शक्य होवू शकते, परंतू समाजाची वास्तू समाजासाठी सोडण्याच इच्छा शक्ती असावी लागते.
दुसरा प्रश्न राहतो , कोर्टात सुरू असलेल्या केसचा , राजगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर पारशी कुटुंब राहत आहे. यावर आम्हाला असे वाटते कि, जर एखादे सरकार परक्या देशातील राज्य शासनाकडून परवानगी घेत करोडो रुपये खर्च करून एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून डॉ. आंबेडकर फक्त काही कालावधी जेथे राहीले ते विकत घेवून ते ऐतिहासिक म्हणून जाहीर करू शकते. तर आपल्याच देशातील आपल्याच नागरिकाकडून घेवून जेथे डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य जास्तीत जास्त वेळ होते. ते राजगृह ऐतिहासिक वास्तू असे जाहीर करुन जनतेसाठी देवू शकत नाही का? जर राज्य सरकार आणि आंबेडकरी नेत्यांनी ठरवले कि, हे करायचे मग त्यासाठी काहीच कठीण नाही. परक्या देशातील परक्या नागरिकाला समजावून बाहेर काढले जाऊ शकते तर, आपल्या देशातीलच आपलेच पारशी समाजातील भाऊ जे ह्या घरात राहत आहेत त्यांना चांगले पर्याय देवून बाहेर काढले जावू शकत नाही का?
२. पुढचा महत्वाचा मुद्दा, वर्षभरापूर्वी वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया शेजारील सिद्धार्थ विहार हे वसतीगृह तोडण्यात आले. ज्याला सुद्धा ऐतिहासिक वारसा आहे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच नाहितर त्याच्या नंतर घडलेली सर्व आंदोलने येथेच बसून ठरविण्यात आली. दलित पॅंथर ची उभारणी, त्याची सर्व आंदोलने, बैठका येथेच उभी राहिली. हेच नाहीतर रामदास आठवले, नामदेव ढसाळ असे अनेक दिग्गज तसेच संभाजी भगत सारखे शाहीर याच वसतिगृहात तयार झाले. हीच डोकेदुखी विशिष्ट समाजाला होती , त्यामुळेच त्यानीं मोठे कारस्थान करून ते नष्ट केले. उद्या तिकडे एखादी मोठी वास्तू बनेलही, जशी आंबेडकर भवन च्या जागेवर बांधण्यात येणार आहे. पण मग त्या ऐतिहासिक वारश्याचे काय?
कोणत्याही चानेल ने साधी दखल घेतली नाही.
बाकी इतर भाकरीच्या तुकड्याने शांत आहेत, मग प्रकाश आंबेडकर याना त्यावर पत्रकार परिषद किंवा एखादा मोर्चा काढावा असे का वाटले नाही. त्यात त्यांची एखादे कार्यालय नव्हते हे कारण असावे का?
३. आता आपण पुन्हा आंबेडकर भवन बद्दल बोलू, १५ तारखेला ठरलेला मोर्चा अचानक १९ तारखेत बदलला जातो. याबद्दल आयोजन करीत असणाऱ्या एका नेत्याला विचारले असता त्यांच्या एका आयोजक कार्यकर्त्याने असे सांगितले कि, १५ तारखेस आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर ला गेलेला वारकरी समाज येवू शकणार नाही. यावर माझ्या डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला तो असा, आषाढी एकादशी ला पंढरपूर ला जाणारा हा आंबेडकरी समाज आहे का ? एक वेळ मान्य करू, आहे मग ह्या समाजाला आंबेडकरी भवन आणि त्याची महती माहीत असेल का? खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माहिती असतील का ? नसतील तर मग हा समाज मोर्च्यात कशासाठी येणार?
गणेश मंदिरात नारळ फोडून पूजा घालणारे प्रकाश आंबेडकर जर त्यांचे नेतृत्व करत असतील तर पुढे बोलण्यासाठी काही नाही.(संदर्भ: हा व्हीडीओ सोशल मीडीया वर सगळीकडे पसरला आहे. आता पर्यंत कोणी पाहीला नसेल तर नवलच )
तसेच आंबेडकर भवन एका रात्रीत तोडले गेले नाही , तर याची संपूर्ण पूर्व कल्पना प्रकाश आंबेडकर याना होती. याबाबत प्रकाश आंबेडकर यांचे एक कार्यकर्ते म्हणाले, रत्नाकर गायकवाड हे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आंबेडकर भवन च्या जागेवर १७ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव घेवून गेले होते, परंतू प्रकाश आंबेडकर यांनी रत्नाकर गायकवाड याना उडवून लावले. त्यावर या अंध भक्त कार्यकर्त्याने पुढे असे जोडले कि, रत्नाकर गायकवाड यानी त्याचवेळेस पत्रकार परिषद घेतली असती तर हे लोकांना कळले असते, यावर त्या भक्ताला मि विचारले कि, रत्नाकर गायकवाड तर सरकार चा बाहूला होता , परंतू प्रकाश आंबेडकर यांना ते पाडण्यात येणार याची जाणीव होती ना , मग त्यानींच पत्रकार परिषद घेवून का जाहीर केले नाही आणि आंबेडकरी समाजासमोर हे होवू देणार नाही, एकत्र या असे आवाहन का केले नाही, ते आंबेडकर भवन पाडे पर्यंत ते का वाट बघत राहीले? कि, तडजोड होण्याची वाट बघत राहीले? यावर त्या भक्ताने असे उत्तर दिले कि, येथे प्रकाश आंबेडकर यांचे खरच चुकले. पन ते आता आलेत ना मग आपल्याला जायला हवे. यावर हसावे कि रडावे हेच समजेनासे झालेय.
४.शेवटी आणखीन एक महत्वाचा मुद्दा, कधीही जय भिम न घालणारे आणि आयुष्यभर ज्यानी आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करण्यापेक्षा मार्क्सवाद जोपासला , ते समाजवादी अशा वेळेस नेतृत्व घ्यायला पुढे का असतात? या समाजवाद्यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे असणाऱ्या कामगार वर्गाला जरी फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारधारा सांगितली असती तर आजचे आंबेडकरी चळवळीचे चित्र वेगळे असते.
मित्रांनो हे सगळे अस्तित्वाचे राजकारण आहे. यात आपण भरडले जाऊ नये इतकेच, विचार करा. एका बाजूला आपल्याला इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक आणि लंडन मधील घर दाखवले जात असताना आपल्या ऐतिहासिक वास्तू नष्ट केल्या जात आहेत. आंबेडकरी विचारांचा आणि चळवळीचा इतिहास पुसून टाकला जात आहे. मोर्च्याच्या काही दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर भवन ला भेट दिली, त्यानंतर आंबेडकर भवन च्या कामास स्थगीती देण्यात आली. आता कोर्टात केस जाईल, मग निकाल लागेपर्यंत १० ते १५ वर्षे निघून जातील. यात आता आपण कीतीही म्हटले की समाजाच्या पैशातून उभारू , तरी कोर्टाच्या पुढे कोणीही जाऊ शकणार नाही. इंदूमिल वरील स्मारकाची आणि आंबेडकर भवन ची वाट बघता बघता आपण पूर्ण शिवराय, फुले,शाहू आणि डॉ. आंबेडकर यांचे कार्य आणि विचार विसरले गेलेलो असू , पुढे आणखी काही वर्षानंतर शिवराय , फुले , शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना आपल्या देव्हाऱ्यात पुजत असू.
धन्यवाद....
प्रमोद शिंदे
आंबेडकरी योद्धा
९९६७०१३३३६
२० जुलै २०१६

Wednesday, June 15, 2016

एकनाथ खडसे बाबत नारायण राणे यांचे विधान, कितपत खरे? कितपत खोटे?

एकनाथ खडसे बाबत नारायण राणे यांचे विधान, कितपत खरे? कितपत खोटे?

      दिनांक ४ जुन रोजी झी २४ तास या वाहीनी वर रात्रौ ९ वाजता रोखठोक मध्ये एकनाथ खडसे यांचा राजीनामा” या विषयावर चर्चा  भरविण्यात आलेली होती. त्यात उदय निरगुडकर यानी एक मुद्दा चर्चेला घेतला, मुद्दा होता एकनाथ खडसे यांच्या राजीनामा नाट्यानंतर नारायण राणे यानी केलेले विधान,  ते वक्तव्य असे होते “एकनाथ खडसे यांचा राजीनामा म्हणजे बहूजन नेतृत्वाचा बळी दिला गेलाय". ह्या मुद्द्यावर सर्वप्रथम उदय निरगुडकर यानी विश्वंभर चौधरी यांना बोलायला सांगितले, यावर स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या विश्वंभर चौधरी यानी जो आकांडतांडव केला होता,  तो त्यांची वस्तूस्थीती दाखवत होता, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आतला चेहरा दाखवत होता. विश्वंभर चौधरी यानी नारायण राणे यांच्यावर जे तोंडसुख घेतले ते सगळे येथे सांगण्यासारखे नाही, त्यातळे एक विधान असे होते की, कॉंग्रेसने असल्या  ........   माणसाला पक्षात घेतले कशाला?   यावरूनच आपण हे असमाजू शकता की विश्वंभर चौधरी कोणत्या ठरला गेले असतील, पुढे ते हे आठवण करून द्यायला विसरले नाहीत , राणे बहूजन असतानाही   बाळासाहेबानी त्याना मुख्यमंत्री केले होते. यावरून विश्वंभर चौधरी यांना सेना भाजप कसे पुरोगामी आहेत आणि राजकारणात सत्तेसाठी जातपात बघितली जात नाही, असे दर्शवायचे असेल तर खरे कारण विश्वंभर चौधरी यांना माहीत नसावे, किंवा त्यांना फक्त संघाच्या अजेंड्यावर नारायण राणे यांचे म्हणणे कसे खोटे आहे,  हे आततायी पणे सांगायचे असेल.  

मनोहर जोशी याना मुख्यमंत्री पदावरून दूर करून नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदावर का बसविण्यात आले आणि तेही अगदी शेवटचे काही महिने,  विश्वंभर चौधरी यांना आठवत नसेल तर येथे स्पष्ठ करतो कि, चार वर्षानंतर मनोहर जोशी यांना पदावरून काढण्या अगोदर दोन वेळेस मनोहर जोशी यांना पदावरून काढण्याचे प्रयत्न झालेले होते. या मागचे कारण असे होते कि, मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर अगदी पेशवे असल्यासारखे वागत असत. कोणालाही न जुमानता अगदी मातोश्री लाही विचारात न घेता आपले निर्णय घेत होते. त्यातल्या त्यात मनोहर जोशी यांच्या जावयाने पुण्यातील शाळेचा भूखंड लाटल्याचे प्रकरण मनोहर जोशी यांच्या अंगलट आले होते. मनोहर जोशी यांना काढल्यानंतर शिवसेनेतील इतर नेत्यांपेक्षा मोठा जनाधार असलेले आणि कोकण आणि मुंबईत मोठे वर्चस्व असलेले नारायण राणे हेच एकमेव होते. मुंबईत वसलेल्या कोकण वासीयांच्या जोरावर मोठी झालेली असल्याने शिवसेनेला नारायण राणे यांच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे विश्वंभर चौधरी यांचे नारायण राणे यांच्याबाबत चे विधान ते बहुजन असतानाही त्यांना मुख्यमंत्री केले हे विधान अगदी खोटे ठरते. शिवसेनेसमोर नारायण राणे यांच्या तोडीस तोड कोणीही नव्हते त्यामुळे नारायण राणे यांना मुख्यमंत्री करणे शिवसेनेला भाग होते. तसेच त्यावेळेस मातोश्रीवर झालेला आर्थिक व्यवहारही लपलेला नव्हता.   

   आतापर्यंत उदय निरगुडकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत हे बऱ्यापैकी लोकांना माहीत होते. कारण उदय निरगुडकर याना  ठाण्यातील संघाच्या शाखेत अर्ध्या चड्डी वर जाताना पाहणारे बरेच आहेत. तसेच निरगुडकर यानीही त्यांचे संघप्रेम कधी लपवले नाही, २०१४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी त्यानीही स्वतः भाजप चे कार्यकर्ते असल्याचे जाहीर केले होते. परंतु विश्वंभर चौधरी यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, हेच या वरून दिसून आले.
दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांचे वक्तव्य हे अगदी पूर्णपणे राजकीय होते. त्या वक्तव्याचा वापर त्याना राजकारणासाठी करायचा होताहे कोणीही अगदी सहजपणे सांगेल. परंतु त्यामूळे नारायण राणे यांचे एकनाथ खडसे बाबतचे विधान खोटे ठरत नाही.

हा वाद बहुजन वर्ग विरुद्ध अभिजन वर्ग असा आहे, सोप्या भाषेत सांगायचे तर ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर समाज असा आहे, आणि यात सतत बहुजानांचाच बळी गेलाय हेच दिसून येते. सध्या अस्तित्वात असलेल्या पैकी अधिक प्रसारमाध्यमे अभिजन वर्गाच्या हाती आहेत. त्यामुळे ही प्रसार माध्यमे बहुजन वर्गातील व्यक्तीच्या आणि अभिजन वर्गातील व्यक्तीच्या विधानाबाबत आणि कृतीबाबत सतत वेगळी भूमिका घेताना दिसतात, याची काही उदाहरणे अशा प्रकारे देता येतील.

३ वर्षापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळावर भाष्य करताना “धरणातच पाणी नसताना आता आम्ही काय त्यात मुतावे का? असे विधान केले होते. हे विधान निश्चितच लाजिरवाणे आहे, याला कुठेही योग्य बोलता येणार नाही. परंतू या वाक्यावर या प्रसारमाध्यमांनी अगदी तोंड फाटेपर्यंत तोंड सुख घेतले होते, अजित पवार यांच्या विधानापेक्षा जास्तच लाजिरवाण्या भाषेत अजित पवार यांच्यावर लाजिरवाणी विधाने केली गेली. अगदी अभिजन वर्गाच्याच हातात असलेल्या नाटक आणि सिनेमातही याची खिल्ली उडवली गेली, ते अगदी आजही सुरु आहे. या उलट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३ मे २०१५ रोजी नागपूर मध्ये भाजप पक्षाने आयोजित केलेल्या दुष्काळावरील कार्यशाळेत एक विधान केले होते, “शेतात पाणी नसेल तर शेतात मुतावे, याने शेत पिक दुप्पटीने वाढते, मी माझ्या १ एकराच्या जागेत असेच करतो” प्रसारमाध्यमात ही बातमी दाखविली गेली होती. पण अजित पवार यांच्या वर या स्व-कथित समाजसेवकांनी आणि प्रसार माध्यमांनी जे तोंडसुख घेतले तसे यावेळेस नितीन गडकरी याबाबत हे घडताना दिसले नाही. उलट प्रसार माध्यमांनी ही बातमी दडवण्याच जास्त प्रयत्न केला.

दुसरे उदाहरण द्यायचे तर महिन्याभरापूर्वी घडलेले युवा भाजप चे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे प्रकरण आणि सध्याचे एकनाथ खडसे प्रकरण घेवूयात. दोन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत परंतू दोघांची गंभीरता कमी नाही. उलट गणेश पांडे यांनी त्यांच्याच पक्षाच्या आणि अभिनय क्षेत्रातील एका महिला कार्यकर्त्यावर केलेला बलात्काराचा प्रयत्न आणि त्यातून त्या महिलेने गणेश पांडे यांच्यावर केलेले आरोप हे नक्कीच एकनाथ खडसे पेक्षा जास्तच गंभीर आहेत. परंतू ज्या प्रकारे प्रसारमाध्यमे आणि स्व कथित समाज सेवक यांनी दिल्ली बलात्कार प्रकरणात भूमिका होती किंवा आज ज्या प्रकारे बोलत आहेत आणि एकनाथ खडसे यांचा राजीनामा कसा योग्य आहे असे सांगत आहेत त्या प्रसार माध्यमांनी आणि स्व कथित समाज सेवकांनी गणेश पांडे यांचे काय केले? कुठे आहे तो ? मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षाच्याच हातात असलेल्या महिला आयोगाच्या हाती चौकशीचे आदेश दिले, आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपाबाबत म्हणावे तर काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. आज एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करणाऱ्या आणि उपोषणाला बसणाऱ्या अंजली दमानिया यांनी दोन वर्षापूर्वी नितीन गडकरी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते स्वतः कडे नितीन गडकरी यांच्या विरोधात भरपूर पुरावे असें त्या सांगत होत्या. हे प्रकरण इतकं गाजले कि, अंजली दमानिया यांचेही रायगड जिल्ह्यातील जमिनीबाबत घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आले होते. यावर प्रश्न असा उपस्थित होतो कि, या दोघांवरील आरोपांचे पुढे काय झाले? आज याच अंजली दमानिया एकनाथ खडसेबाबत असाच भरपूर पुरावे असल्याचा आरोप करताना दिसत आहेत. यावर राजकारणातील अभ्यासकांनी आणि विश्वंभर चौधरी यानी विचार करायला हरकत नसावी.

राजकारणातील विधानाबाबत म्हणावे तर भाजप चे माजी मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांनी ठाण्यातील पाणी पूरीवाल्याच्या प्रकरणात त्या पाणी पूरीवाल्याचे कारस्थान आपल्या मोबाईल मधे कैद करणाऱ्या अंकिता राणे बाबत केलेले विधान काय अभिमानास्पद होते काय? राज पुरोहित यांच्या विधानावर अभिजन वर्गातील कोणत्याही प्रसार माध्यमांनी, समाजसेवकांनी आणि राजकीय नेत्यांनी काहीही वक्तव्य केले नाही. एक ते दोन दिवस तेही छोटी एकादी बातमी करायची नंतर ती बातमी बुडाखाली दडवून ठेवायची? नंतर ती कधीही बाहेर येणार नाही याची सोय करायची. अशीच अजून एक बातमी, गोपीनाथ मुंढे यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचे पुढे काय झाले? गोपीनाथ मुंढे यांच्या गाडीला ठोकर मारणारा वाहन चालक महिन्याभरातच स्वतः च्या घरात गळफास लावून आत्महत्या का करतो? हे अजून गुपितच आहे. गोपीनाथ मुंढे सारख्या बलाढ्य नेत्याच्या मृत्युच्या चौकशीचा अहवाल दोन वर्ष झाली अजून बाहेर येत नाही. ही आश्चर्याची गोष्ठ नाही का?

यावर नारायण राणे यांचे विधान खरे वाटायला हरकत नाही, अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्या बाबत एक भूमिका घेणारी ही प्रसार माध्यमे आणि स्व कथित समाज सेवक नितीन गडकरी, गणेश पांडे, अंजली दमानिया आणि राज पुरोहित यांच्याबाबत वेगळी भूमिका घेताना घेताना दिसून आलेले आहे. असो नारायण राणे यांचे विधान “बहुजन नेत्यांचा बळी दिला गेलाय” हे अगदी खरं आहे कि, अभिजन वर्ग आणि बहुजन वर्ग वादात सतत बहुजनांचा बळी दिला गेलाय. तसेच विश्वंभर चौधरी हे अभिजन वर्गाचे कारस्थान लपविण्यासाठी वापरण्यात आलेले वरून पुरोगामी दिसणारे बाहुले आहे हेच सिद्ध होते.
-    प्रमोद शिंदे
मुंबई
(९ जून २०१६)

तर महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी भरडला जाईल.

तर महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी भरडला जाईल.

महाराष्ट्रावर प्रेम करणारे याकडे लक्ष देतील का?
मुद्दा आहे या भागात वितरित होणाऱ्या पिशवी बंद दुधाचा !
मुंबई आणि परिसरात प्रामूख्याने गोकूळ, महानंदा आणि आरे या महाराष्ट्रातील प्रमूख दुग्धव्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे पिशवी बंद दुध वितरित होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घराघरातून गोळा केलेले दुध गोकुळ, महानंदा आणि आरे या कंपन्यांच्या मदतीने महाराष्ट्रभर  वितरित केले जाते. यातून या दुध उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळत असतात.
काही वर्षापूर्वी गुजरातमधील अमूल या दुग्धव्यवसाय करणाऱ्या कंपनीने महाराष्ट्रात प्रवेश केला. परंतू तो अगदी अत्यल्प होता. मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी अमुल दुध नाकारले. फक्त काही गुजराती भाषिक नागरिकांनी आपले राज्य प्रेम दाखवून अमूल दुध घ्यायला सुरवात केली. तेही प्रमाण अगदी अत्यल्प होत. परंतु आता या अमूल कंपनीने ३ ते चार महिन्यापासून कुटील खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे. यात स्थानिक आणि वरच्या स्थरातील राजकारणी सामिल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजारातून हळूहळू गोकूळ, महानंदा आणि आरे दुध कमी करून ग्राहकांच्या माथी अमूल दुध  मारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
३ महिन्यापूर्वी माझ्या घरी येणारे महानंदा दुध अचानक पणे बंद करून त्याजागेवर अमुल दुध  टाकले गेले. आम्हाला वाटले आज चुकून झाले असावे,  म्हणून आम्ही शांत राहिलो, परंतू दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी परत तेच झाले.  मग तिसऱ्या दिवशी मि वितरकाला याचा जाब विचारला, त्यावर त्याने सांगितले कि , महानंदा बंद झाले, यावर मि म्हटले, "मग गोकूळ चे देत जा". त्यावर तो वितरक म्हणाला ते आपल्याकडे येत नाही , मि म्हटले ठिक असे म्हणून आपल्या कामासाठी गेलो. त्या दिवशी मि पूर्ण दिवस जवळपास च्या तसेच इतर दुकानात चौकशी केली. अगदी गोकूळ, महानंदा यांची संकेतस्थळ तपासली. परंतु कोठेही महानंदा किंव्हा गोकूळ बंद झाल्याचे ऐकले किंव्हा वाचले नाही.
मग मि दुसऱ्या दिवशी याचा जाब वितरकला विचारला, तर या वेळेस त्याने सांगितले कि, महानंदा मागे कमी कमिशन मिळते, यावर मि म्हटले, अगोदरच १९ रुपयांची ची पिशवी तुम्ही २० रुपायात देता. शिवाय प्रत्येक पिशवी मागे तुमचे मार्जीन वेगळे घेता, मग अजून किती हवय?  उद्या पासून मला महानंदा आणून द्या अन्यथा दूध बंद करा. यावर त्याने होकार देत, माझ्याकडे महानंदा दुध पिशवी द्यायला सुरुवात केली.
बांधवांनो आज याची आठवण यासाठी झाली की आज त्या वितरकाने पून्हा तेच केले आणि मि अमूल घ्यायचे नाकारले आणि  पून्हा तिच चर्चा आम्हा दोघात झाली.
याबद्दलचा इतिहास असा कि, महानंद जेव्हा भरात होती तेंव्हा विक्री साडेआठ लाखावर गेली होती.  त्यावेळी खप वाढविण्यासाठी गुजरातमधे पाय रोवण्याचे प्रयत्न व्यवस्थापनाने केले होते. पण हल्ले करून दगडफेक करून हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. त्याच अमूलने आता महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे, अमूलने वसईजवळ डेरी काढली तर शरद पवारांसह अनेक राजकारणी हजर होते,  आता विदर्भात मोठी डेरी काढण्याचे घाटत असून गडकरींनी त्याचे स्वागत केले आहे.
बांधवानो, शेती करणारा शेतकरी सरकारच्या खाजगी करणाच्या धोरणांमुळे रसातळाला जावून आत्महत्या करत आहे. आता हाच कुटील खेळ अमूल सोबत मिळून काही राजकारणी करत असतील तर, उद्या दुध उत्पादक शेतकरी ही आत्महत्या करताना दिसेल. या कुटील खेळात महानंदा आणि गोकूळ कंपन्याचे अधिकारी ही वरच्या कमाईसाठी सामिल असण्याची शक्यता आहे.
बांधवानो आपण जर खरच महाराष्ट्रावर प्रेम करत असू आणि आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाने जगू द्यायचे असेल. तर आपल्याला आपल्या शेतकरी बांधवाच्या हातात चार पैसे मिळतील, त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटतील,  या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी या अमूल सारख्या उद्योगपतीचा कुटील खेळ,  आपल्या राजकारण्यांचे गुजरात प्रेम आणि स्थानिक अधिकारी वर्गाचा भ्रष्टाचार पायदळी तुडवावा लागेल. मुंबई आणि परिसरात स्थलांतरित गुजराती बांधव ज्या पद्धतीने आपल्या राज्यावर प्रेम करून त्या राज्यातील व्यावसायिकाना सहकार्य करतात त्याप्रमाणेच आपल्यालाही आपल्या राज्यावर प्रेम व्यक्त करताना आपल्या राज्यातील व्यावसायिकाना पाठिंबा द्यावा लागेल. आपले जर खरे महाराष्ट्रावर प्रेम असेल आणि आपले दूध उत्पादक शेतकरी आनंदाने जगावेत असे वाटत असेल तर आज पासून आपण महाराष्ट्रात उत्पादन होणारे कोणत्याही कंपनीचे दुध घ्या, यात गोकूळ, महानंदा, आरे आणि इतर अनेक पर्याय आहेत.
बांधवानो लक्षात ठेवा, आपला शेतकरी जगला तरच भविष्यात आपण आनंदाने जगू.
धन्यवाद!
प्रमोद शिंदे
(९९६७०१३३३६)
"शेतकरी माझा भाऊ"

Tuesday, May 24, 2016

भाजप ची बचाव नीती

भाजप ची बचाव निती .............
मिडिया हातात असल्यास आपण आपल्याला हवे ते कश्याप्रकारे दाखवू शकतो ... याचा प्रत्यय आज पून्हा आला.
काल पासून संपूर्ण मिडिया भाजपचे अभूतपूर्व यश अशा बातम्या पसरवत आहे.
परंतू खरी परिस्थिती काय आहे.
परंतू काल जाहीर झालेल्या 5 राज्यातील निकालावरुन असे दिसते कि ,...
विधानसभेच्या एकुण जागा * 822 * त्या मधे भाजपला फक्त * 93 *(तेही मित्रपक्षाच्या जागा पकडून) जागा मिळाल्या.
आणि अभूतपुर्व यश म्हणजे काय तर, खालील . तिन राज्यात ही परिस्थिती
_👇🏼 *BJP*
केरळ -१
तामिळनाडू -0
पाँडिचेरी -0
मग भाजपचे अभूतपूर्व यश या अशा जाहीरातीतून
नक्की भाजप ला सांगायचे काय ?
१) वासरात लंगडी गाय असलेल्या अमित शहा याना सांभाळायचे आहे का?
२)साध्वी ला आम्ही बाहेर काढले , आणि लोकांनी आमची पाठ थोपवली. (तरी मतदान झाल्यावर साध्वी ला बाहेर आणले. नाहीतर नागडे पडायची वेळ आली असती.
३) बघा कॉंग्रेस कशी हरली, हे दाखवायचे आहे. (पण डाव्या आणि स्थानिक पक्षानी आपली कशी सुजवली हे चेहऱ्यावर अजीबात दाखवायचे नाही.)
मि व्यंगचित्रकार नसल्याने मला ते काढता येत नाही. नाहीतर आज माझ्या डोळ्यासमोर जे चित्र दिसतय ते प्रत्यक्षात आले तर भाजप समर्थक आणि मिडीया या दोघांना चांगल्या मिरच्या झोंबल्या असत्या.
खरे कारण हे आहे कि, पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, गुजरात आणि सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत आपल्या समर्थक आणि मतदारांना निराश होवून इकडेतिकडे पळण्यापासून वाचवण्यासाठी भाजपची ही बचाव नीती आहे. हे खऱ्या राजकीय अभ्यासकांना समजल्याशिवाय राहणार नाही.
- प्रमोद शिंदे
भारत संस्कार आंदोलन
9967013336