मावळ्या कधी होशील खरा मावळा ?
काही दिवसांपूर्वी कर्जत मधील कोपर्डे येथील बलात्काराच्या घटनेने सध्या महाराष्ट्रात जे राजकारण पहायला मिळतय ते अगदी विकृत स्थरावर चालले आहे. या घटनेचा जेवढा वापर करून घेता येइल तेवढा प्रत्येक संघटना करताना दिसून येत आहे.
काहीजन तर विकृतिच्या इतक्या थराला गेलेत की , "आता बोला " अशीच बोलणी सुरू आहे. आमच्या लोकांनी केलेले बलात्कार होते. मग आता बोला तुमच्या लोकांनी केले त्याचे काय ?
अशी ही मागणी होत असताना तोंडात सरास दलित शब्द आनित आहेत. जेंव्हा एखाद्या समाजाला आपण दलित म्हणून हिणवत असतो, तेंव्हाच त्यांच्या डोक्यातील विकृती दिसून येत असते. दलित शब्द तोंडी येणे हिच विकृत मानसिकता आहे. ज्या पद्धतीने मराठा ही जात नाही त्याच पद्धतीने दलित ही सुद्धा जात नाही.
ज्यांना याची काडीचीही माहीती नाही तेच आज या दोन्ही समाजाचे स्वतः च नेते असल्याचे भासवून दोघांत भांडणे लावयचे कार्य करित आहेत. दोन्ही सामाजातील सुशिक्षित तरुणांना एकमेकांपासून तोडत आहेत.
ही विकृत चाल हजारो वर्षापासून कोण खेळतय हे आता प्रत्येकाला कळून चुकले आहे. तरिही काही स्वार्थी व्यक्ती सत्ता लालसेपोटी यांच्या चालीत खेळणे होवून बोंबा मारताना दिसत आहेत.
या सर्व प्रकरणातून कारस्थानी मेंदूला एका दगडात तीन पक्षी मारायचे आहेत.
१. आ. ह. साळूंखे , मा. म. देशमुख , पुरुषोत्तम खेडेकर , श्रिमंत कोकाटे आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रबोधना मुळे एकत्र आलेले महार मराठा आणि कुणबी मराठा तसेच या प्रबोधनामुळेच शिवराय, फुले, शाहू आणि डॉ. आंबेडकर यांना विचारांच्या एकाच प्रवाहात पाहणाऱ्या सुशिक्षित कुणबी मराठा आणि महार मराठा या दोन समाजामध्ये फुट पाडून एकमेकांमध्ये वैर निर्माण करायचे आहे.
२. या वैरामुळे दोन्ही समाज वेगळे करून त्यांच्या नेत्याला भाकरीचा तुकडा टाकून पाळीव प्राणी बनवून टाकायचे आहे. उठ म्हटले उठ , बस म्हटले कि बस, अशी अवस्था करून टाकायची. पुढे आपल्या हातातील मिडिया अस्त्राव्दारे हाच तुमचा नेता म्हणत डोक्यावर मारायचा आहे.
३. हे दोन्ही समाज लढत बसले कि, या दोन्ही समाजाचे मूळ प्रश्न बासनात गुंडाळून , त्यांच्या समोर खोटे प्रश्न उभे करायचे. याउपर आम्हीच तुमचे खरे मार्गदाता हे चित्र निर्माण करून सत्ता आणि संपती दोन्ही आपल्या हातात ठेवायचे.
महार मराठा समाजातील सुशिक्षित तरुणांनी अगदी प्रांजळपणे हे मान्य करायला हवे कि, ॲट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे. काही स्वार्थी नालायक या कायद्याचा आणि त्याची भीती याचा वापर पैसा वसूली साठी करत आहेत , यात गावातील पोलिस अधिकाऱ्यांचा वाटा ठरलेला असतो. गावातील भांडणातील एका महार मराठा व्यक्तिला तु तक्रार कर, तुला पैसे मिळवून देतो असे सांगायचे मग तो पैश्यांच्या लालसेने तक्रार करतो. दुसऱ्या बाजुला कुणबी मराठा समाजातील व्यक्तीला पोलिसांच्या मदतीने केस दाबण्यासाठी पैसे मागायचे. झाले मग घाबरून तोही पैसे देण्यासाठी तयार होतो. असे स्वार्थी नालायक नेते गावागावांत बिना काम धंदा करत बुलेट वर फिरताना दिसतात. मग त्याना अगोदरच एखादा अडाणी भाकरिच्या तुकड्यांना लाचार झालेला नेता आपल्या पक्षाचा पदाधिकारी नेमतो. त्याची सर्व कृत्ये पाठीशी घालतो. मग झाले हा गावतला रिकामटेकडा या पक्षाच्या नेत्यालाच आपला माणतो. यामुळे गावागावांत पक्ष ही पोहचला आणि पक्षसाठी खर्च करणारा बकराही मिळाला.
आपण आतापर्यंत झालेले कोणतेही हत्याकांड बघू , तिकडे सर्व प्रथम कोण उपस्थित असते, तसेच कोण याचा बागुलबुवा करते. एक तर रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते आणि दुसरे पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले समाजवादी, अगदी सध्याच्या कोपर्डे मधील घटनेतही अगोदर हेच दोघे पोहचले, पण जेंव्हा कळले कि, बलात्कारीत मुलगी कुणबी मराठा समाजातील आहे तर या दोघांनी तेथून पळ काढला. रिपब्लिकन पक्ष लपून बसला तर समाजवादी कुणबी मराठा नेत्याच्या घरात गेला.
जामखेड आणि शिरडी प्रकरणात जातीय अत्याचाराची बोंब ठोकणारे RPI आणि समाजवादी ह्या
प्रकरणातील सत्य बाहेर आल्यावर कुठे लपून बसले. आम्ही सुरवातीपासून सांगत आहोत प्रत्येक प्रकरणाला जातीय चष्म्यातून बघणे म्हणजे हे कोणीतरी करत असलेले विकृत राजकारण आहे.
हेच मी माझ्या कुणबी मराठा बांधवांना सांगेन, आपल्यातही अनेक रिकामटेकडे नेते जन्माला येत आहेत. जे सरळ एखाद्या समाजाला दलित म्हणून संबोधित आहेत. त्यांच्या डोक्यातील जातीय उच्चनिचता दिसून येते, तेंव्हाच त्यांच्या बुद्धी ची किव येते. कुणबी मराठा समाजातील तरुणांची माथी भडकवून त्यांना सामाजिक एकतेसाठी काम करणाऱ्या तसेच शिवराय, फुले, शाहू आणि डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यापासून दुर लोटायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची.
खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंब हत्याकांड आणि खर्डा येथील नितीन आगे हत्याकांड हे दोन्ही जातीय मानसिकतेतून झालेय हे अमान्य करण्यासारखे आहे का ? गावागावातून आपल्या कुणबी लोकांच्या डोक्यातून मराठा ही जातीय श्रेष्ठता गेलीय का ? अगोदर कुणबी मराठ्यांनी आपल्या डोक्यातील जात काढायला हवी. महार आणि कुणबी हे दोघे शिवरायांच्या सैन्यातील मराठे आहेत. शिवरायांचे मावळे आहेत. शिंदे, पाटील आणि चौहान दोन्ही समाजात आहेत. मग हा दलित हा मराठा हे कुठून आले ?
मित्रांनो खैरलांजी मधील बलात्कार आणि हत्या असो किंवा कोपर्डे मधील बलात्कार आणि हत्या असो दोन्हीही घटना अतिशय निच पातळीच्या माणूसला काळींबा फासणाऱ्या आहेत, दोन्ही गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच हवी. जेंव्हा आपण कोपर्डे च्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी मागणी करतो तेंव्हा खैरलांजी च्या गुन्हेगारांचे काय झाले हाही प्रश्न विचारायला हवा.
- प्रमोद शिंदे
आंबेडकरी योद्धा
9967013336

No comments:
Post a Comment