माझ्या लेखावरील प्रतिक्रियेची दखल....
२५ जुन च्या रात्री आंबेडकर भवन पाडण्यात आल्यानंतर काल २० जुलै रोजी मी एक लेख लिहला, त्यामुळे अनेकांनी मला फोन केले, त्यात अनेक गोष्टींवर चर्चा झाली, परंतू त्यातील सगळ्यांचा रोष मुख्यतः एकाच गोष्टीवर होता, तो म्हणजे तुम्ही आंबेडकर भवन पाडण्याचा विरोध करत नाहीत तसेच ते पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांच्या विरोधात काहीच बोलत नाही आहात. यावर माझे स्पष्ट मत असे आहे कि, आंबेडकर भवन पाडण्याला आमचा विरोध होता, आहे आणि कायम राहणार आहेच, पण पडद्याआड राहून कारस्थान करणाऱ्या छुप्या शत्रूवर आमचे लक्ष आहे. मि त्या लेखात स्पष्ट पणे मांडलेय, इंदू मिल च्या जागेवर डॉ. आंबेडकर स्मारक उभे राहण्याची वाट बघत असताना आंबेडकर भवन आणि सिध्दार्थ विहार पाडून आंबेडकरी चळवळ, त्याचा इतिहास आणि त्याची केंद्रे संपवली जात आहेत. मित्रांनो , या मागे एक मोठा सुपीक मेंदू कार्यरत आहे, हा सुपीक मेंदू वेळीच ओळखून ठेचायला हवा.
रत्नाकर गायकवाड यांच्याबद्दल आमचे असे आहे कि , कोण आहेत हे? महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त म्हणजेच सरकारी नोकर आहेत. प्रथम दर्शनी आंबेडकर भवन पाडण्यात हे दोषी आहेत हेच दिसून येते आहे म्हणून त्याबद्दल आम्ही आणि संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांना कधीही माफ करणार नाहीच . आपल्याला हेही समजून घ्यायला हवे कि, आंबेडकरी समाजाचे विचार केंद्र पाडण्याची हिम्मत राज्य सरकार च्या पाठिंब्या शिवाय कोणीही करणार नाही आणि आंबेडकर भवन पाडण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा रत्नाकर गायकवाड याना असणार हे नक्की आहे. यावर स्पष्टीकरण देताना काल विधानपरिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यानी जरी रत्नाकर गायकवाड हे राज्यपाल नियुक्त आहेत त्यांचा सरकार शी काहीही संबंध नाही असे सांगून सरकार यात कुठेच नाही हे दाखविण्याची नौटंकी केली असली तरी, राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे त्यांच्याच भाजप पक्षाचे तेलंगणामधील मोठे नेते आहेत, हेही माहिती असावे. तसेच राज्याचा माहीती आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात काय नाते असते हे राजकारणातील प्रत्येक जाणाकाराला माहीत असते, त्यामुळे फडणवीस यानी आपले उघडे पडलेले.......... झाकण्याचा प्रयत्न करू नये.काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजून एक सांगितले कि , प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यानी आंबेडकर भवनाच्या डेवलपमेंट चा प्लॅन द्यावा सरकार ती वास्तू पुन्हा बांधून देइल. आता यावर या दोन्ही बंधूची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
मित्रांनो, आपल्याला जर एखादा दगड येवून लागला तर आपण दगडाकडे बघून विवळत किती काळ बसणार ? आपल्याला लागलेल्या दगडापेक्षा तो दगड कोण मारतय याकडे कधी बघणार? दगड मारणारे हात तर कलम करायचेच आहेत पण आदेश देणारा मेंदू कधी ठेचणार ?
आपण गेल्या काही वर्षात आंबेडकरी चळवळीत झालेल्या घटना पाहू.
१. भाजप सरकार सत्तेवर येताच इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या आंबेडकर स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यात असलेले लंडन मधील घर जनतेसाठी खुले.
३. भाजप सरकार तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १२५ वी जयंती साजरी करण्याचे आदेश, १२५ रुपयांचे नाणे चलनात आले.
या सर्व गोष्टी मनाला सुख देणाऱ्या असल्या तरी या काही इतर गोष्टीही महत्वाच्या आहेत.
१. महाराष्ट्र अनिस चे नरेंद्र दाभोळकर यांची ४ वर्षापूर्वी हत्या, तपास अजून लागलेला नाही.
२ . आंबेडकरी कवी सचिन माळी याला नक्षलवादी म्हणून अटक
३. शिवशक्ती भिमशक्ती चा नारा देत आठवले शिवसेनेसोबत युतीत सामिल.
४ . ऐन निवडणुकी अगोदर आठवले शिवसेनेला दूर लोटत भाजपच्या मागे
५ . भाजप सरकार सत्तेवर येताच सरकारी अधिकाऱ्यांनी नोकरीत सामील होण्यापूर्वी घ्यावी "देवाची शपथ," महाराष्ट्र सरकार ने काढला आदेश .
६. रस्त्यावर मोर्चा, आंदोलन काढण्यास आणि सरकार विरुद्ध घोषणा देणाऱ्या विरूध्द पोलिसी कारवाई चे आदेश.
७. संविधानातील धर्मनिरपेक्ष काढून पंथ निरपेक्ष टाकण्याची मागणी.
८ . हैदराबाद मधील तरुण आंबेडकरी कार्यकर्ता रोहित वेमुला याची आत्महत्या, अजून तपास लागलेला नाही.
९ . मुंबईतील चळवळीचे केंद्र सिद्धार्थ विहार जेथे आंबेडकरी कार्यकर्ते घडले, ते पाडण्यात आले.
१० . कर्नाटकातील लेखक डॉ. कलबुर्गी यांची हत्या, अजून तपास लागलेला नाही.
११. महाराष्ट्रात गोविंद पानसरे यांची हत्या. कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये ते शुद्धीवर आलेले असताना त्याना मुंबईत हलवण्याचा फडणवीस यांचा वादग्रस्त निर्णय, मुंबईत येताच त्यांचा मृत्यू.
१२ . मुंबईतील आंबेडकर भवन पाडण्यात आले. प्रकाश आंबेडकर आणि राज्याचे माहीती आयुक्त चे रत्नाकर गायकवाड यांच्यात शितयुद्ध रंगले.
१३. रामदास आठवले यांची केंद्रिय राज्यमंत्री पदी नियुक्ती.
या सर्व घटना जर आपण बारकाईने पाहील्यास आपल्याला यात काहीतरी कारस्थान शिजत असल्याचा वास नक्कीच येइल. परंतु आपले भिम भक्त या गोष्टींचा विचार करत नाहीत. प्रत्येक घटनेला वेगवेगळ्या नजरेतून पाहतात, आणि प्रत्येक घटनेला भावनिक होत प्रतिक्रिया देतात.
असो पण आता आंबेडकरी योद्धा ने खऱ्या शत्रूच्या दिशेने पाऊल टाकले आहे. शिवराय ,फुले , शाहू आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याच्या प्रचार प्रसाराचे काम सुरू केलेले आहे. फक्त आपण सोबत येण्याची वाट पहात आहोत.
धन्यवाद
प्रमोद शिंदे
आंबेडकरी योद्धा
२१ जुलै २०१६