Wednesday, September 18, 2019

यंदा मतदान नाही.......

यंदा मतदान नाही........
"लाव रे तो व्हिडीओ" म्हणत राज ठाकरे यांनी भाजप, फसनवीस, मोदी, शाह यांची एवढ्या जोरात वाजविली. तरीही भाजप मोदी शाह फसनवीस शांत होते, पण जसा राज ठाकरे यांनी EVM विरोधात आवाज काढला, फॉर्म भरून लोकांना सांगायची तयारी केली जनजागृती चा प्रयत्न सुरू केला. तर लगोलग ने ED ने राज ठाकरे यांची चौकशी सुरू केली. आणि राज ठाकरे यांना शांत केले.
       आमचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे ह्यांनी चूक केली असेल तर चौकशी व्हायला काही हरकत नव्हती पण त्यासाठी जी वेळ या चोरांनी निवडली ती वेळचं सर्व काही सांगून गेली, पाणी इथेच मुरतंय हेचं सांगून गेली. मागील संपूर्ण 5 वर्ष आणि पुढें ज्या वेळेस ते महाराष्ट्र भर "लाव रे तो व्हिडीओ" म्हणत राज ठाकरे या भाजप, मोदी, शाह, फसनवीस यांची वाजवत होते, तो पर्यंत सर्व ED अधिकारी हातभट्टीची मारून निवांत गटारात होते परंतु जसे राज ठाकरे यांनी EVM कडे बोट दाखवलं तर हाथ भट्टीची लावून बसलेली ही मंडळी जागी झाली. यावरून काय सिद्ध होतं तर हेच की तुम्ही इतर काही म्हणा शिव्या घाला यांना काही फरक पडत नाही.  पण ज्याच्यामुळे हे जिवंत आहेत त्या  EVM चं नाव घेऊ नका त्याबद्दल लोकांना जनतेला जागं करू नका. नाहीतर जीव वाचविण्यासाठी हे चोर कुठल्याही स्थरावर जाऊ शकतात. याच नीतीचा वापर करत यांनी देशभर सर्वच नेत्यांना शांत केलंय अगदी महाराष्ट्रातही शांत केलंय, हे आपण कित्येक दिवस वर्तमानपत्रात, वाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर पाहत आणि वाचत आहोत, भावांनो आणि बहिणींनो कोणताही नेता यावर बोलणार नाही या सर्वाना साम, दाम, दंड आणि भेद या चाणक्य नीतीचा वापर करून शांत केले आहे त्यामुळेच या नेत्यांकडून काही होणार नाही. काही होईल अशी अपेक्षा ही ठेवू नका.
त्यासाठी आता भावांनो आणि बहिणींनो जर लोकशाही वाचवायची असेल आपला खासदार आणि आमदार अगदी नगरसेवक ही आपल्या मतांवर निवडून यावं असे वाटतं असेल तर  EVM ला विरोध कायम असू द्या. आता आपल्यालाच खूप काही करावं लागणार आहे लढाई कठीण आहे, म्हणून घाबरून न जाता लढावं लागेल.
भावांनो आणि बहिणींनो समजून घ्या मतदान हा आपला मोठा आणि महत्वाचा अधिकार आहे आणि हेच मतदान कसे करावे हे ठरविण्याचा अधिकारही आपल्यालाच आहे. तर मग हे दिलेले मतं हे आपल्या उमेदवाराला न जाता ते दुसऱ्याला जात असेल तर मतदान करून काय उपयोग आहे?
समजा आपण आपल्या बँकेच्या खात्यात काही पैसे टाकले त्यानंतर त्याची पावती बँक अधिकारी द्यायला तयार नाहीत आणि नंतर कळले की आपले ते पैसे दुसऱ्याच्या खात्यात जात आहेत तर काय करावं?
यावर पैसे टाकणे बंद करावे हाच उपाय आहे.
मतदान हे आपल्या मुलांचं भविष्य ठरवतं समाजाचा,  देशाचा विकास कसा होईल ते ठरवतं म्हणून मतदान हे  पैश्यापेक्षा मौल्यवान आणि जास्त किमतीचं आहे.
म्हणून आपण सर्वांनी बँकेत पैसे टाकणे बंद केले तर शेवटी बँकेला आपली बँक बंद करावी लागेल, बँक वाचविण्यासाठी बँक आपले पैसे आपल्याच खात्यात टाकायला सुरुवात करेल, त्याची पावती सुद्धा देईल. त्याच प्रमाणे आपण जो पर्यंत EVM आहे तो पर्यंत  मतदान करणार नाही किंवा 100% VVPT स्लिप्स म्हणजेच (पावत्या) मोजून आपले मत आपल्याच उमेदवाराला जातेय याची खात्री निवडणूक आयोग देत नाही तो पर्यंत मतदान नाही असा निर्णय घेत नाही तोपर्यंत या नालायक निवडणूक आयोगाचे डोळे आणि कान उघडणार नाहीत.
मी, माझे कुटुंब 25 एक मित्र परिवार त्यांचे कुटुंब सर्वांनी  मतदान करणार नाही असा निर्णय घेतला आहे.
तसेच निवडणूक या आठवड्यात जाहीर होईल, तेंव्हापासून निवडणूक दिवसापर्यंत आपल्या प्रवासात कार्यालयात आपण आपल्या हातात दंडावर काळी पट्टी बांधावी. त्यावर "यंदा मतदान नाही" त्याखाली "हम सब स्वराज्य रक्षक" असे लिहावे.
ही साखळी वाढावी, जनतेत पोहचावी यासाठी हां मेसेज जास्तीस जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
"यंदा मतदान नाही"
- प्रमोद शिंदे
हम सब स्वराज्यरक्षक

No comments:

Post a Comment