Monday, October 14, 2019

लिहायला नको होतं, तरीही लिहलंय.

लिहायला नको होतं, तरीही लिहलंय.
-प्रमोद शिंदे
खरंतर हे मी कुठेही बोलणार अथवा लिहणार नव्हतो परंतु मागील दोन ते दिवसात मला  दोन वेगवेगळ्या पक्षाचे माझे मित्र दोन जण भेटले,  म्हणाले तुम्ही स्वराज्यरक्षक वाले मतदान न करता ती शेकडो मतं वाया घालवित आहात,  ती मते आमच्या पक्षाला देऊन बघा, मी वेळ मारून नेण्यासाठी म्हटलं बघू विचार करू, त्यावर त्यांनी तुम्ही आमच्या सोबत तरी फिरा असे म्हटले, मी हसत होकार दिला.
यानंतर लगोलग डोक्यात दोन गोष्टी आल्या.
1.त्यातल्या एका पक्षाबद्दल विचार करावा तर एकही आंदोलन अर्धवट न सोडणाऱ्या या पक्षाच्या  नेत्याने सुरवातीला EVM विरोधात अगदी पुरावे मांडत गावभर दवंडी दिली. मॅच चा निकाल फिक्स असेल तर मॅच खेळायची कशाला? असे म्हणत निवडणूक आयोगाला आवाहन दिले. परंतु  त्यानंतर ED ने चौकशीला बोलावताच काही झालंच नाही या अविर्भावात  EVM विरोधात एकही शब्द उच्चारला नाही. निवडणुका लढण्यास तयार, त्यातील एकाही भाषणात EVM मुद्दा नाही. उलट या सर्व भाषणात धार्मिक मुद्देच दिसून आले.
2. दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने तर EVM ला विरोध करीत निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टात लढतोय असेच सांगितले.
त्यानंतर आता तर आम्हीच निवडून येणार म्हणत EVM वरच निवडणूक लढविण्यास सुरुवात केली. मग आमच्या डोक्यात असा  प्रश्न असा उपस्थित होतो की EVM ने फसवणूक झाली आणि EVM वर विश्वास नाही म्हणून निवडणूक आयोगा विरुद्ध कोर्टाचा जायचं आणि दुसऱ्या बाजूला EVM वर होणाऱ्या निवडणूका लढवायच्या! हे असं का बरं? 
असा प्रश्न एकाही भक्ताला हा पडत नाहीय, शेवटी भक्तच ते !
असे अनेक प्रश्न आहेत,
ज्या मुद्दयांमुळे या पक्षाचे नेते चर्चेत आले,  गावागावात, वस्त्यांमध्ये पोहचले.
1. आंबेडकर भवन पाडले गेले, तुम्ही सर्वाना सोबत घेऊन भला मोठा मोर्चा काढलात. आंबेडकर भवन च्या आड आंबेडकरी चळवळीचे केंद्र क्रांतिकारक  घडविणारं गर्भाशय म्हणजेच सिद्धार्थ वसतिगृह पाडले गेले.
मुंबईत फक्त आंबेडकर भवन च्या  नावाने भला मोठा मोर्चा काढला.
विस्मरणात गेलेल्या नेत्याला पुन्हा  ओळख मिळाली.
पुढें काय?
2. भीमा कोरेगाव आंबेडकरी समुदायावर हल्ला झाला. या नेत्याने भिडे आणि एकबोटे यांना अटक व्हावी  यासाठी महाराष्ट्र बंद ची  घोषणा केली. आमच्यासह सर्वच जनतेने साथ दिली.
पुढें काय?
3.12 ऑगस्ट ला कोल्हापूर हायवे वर या पक्षाने 2800 EVM मशीन पकडल्या त्याचं पुढें काय?

असे काही प्रश्न आहेत, जे या दोन्हीही नेत्यांच्या कामकाजावर आमच्या डोक्यात शंका उपस्थित करतात. या दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते खूप  प्रामाणिक आणि मेहनती आहेत. त्यांच्याबद्दल मनात काडीचाही राग नाही उलट आदरच आहे.
परंतु यांच्या नेत्यांनी फक्त एकदा सांगावं EVM बरोबर आहेत, आम्ही कोर्टात केस नाही किंवा ED चौकशी पूर्वी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट, पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांची भेट, मुंबईतील पत्रकार परिषद हे सर्व खोटे होते. आम्हाला आम्ही दिलेल्या मतांचा हिशोब मिळेल,
आमचे मतं आमच्याच उमेदवाराला जातेय हे आम्हाला समजेल.
होतंय का शक्य? बघा.... नाही ना !
जो नेता स्वतःशी, स्वतःच्या मताशी आणि कार्याशी प्रामाणिक नाही.  त्याच्याबद्दल आणि त्याच्या पक्षाबद्दल काय विचार करावा.
आमची लढाई या व्यवस्थेशी आहे.
आम्हाला ती लढू द्यात, कधी ना कधी तुम्हालाही आमच्यासोबत यावंच लागेल.
मग आत्ताच का नको.
धन्यवाद !
EVM आहे तर मतदान नाही.
- प्रमोद शिंदे
हम सब स्वराज्यरक्षक
9967013336
माझे आणखीन लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर जाऊन माझ्या ह्या ब्लॉग वर भेट द्या.  http://pramodtpshinde.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment