Thursday, July 30, 2020

गावाकडच्या गोष्टी- भाग 4

गावाकडच्या गोष्टी- भाग चार 

मित्रांनो, मोदी आपल्यासाठी नविन नाहीय, प्रत्येक मोठ्या कुटुंबात एक तरी मोदी असतोच. 
मोदी म्हणजे काय तर... 
या मोदीला घरातली कामे म्हटलं नाकी नऊ येतात पण बाहेर फिरायची कामे असतील तर बेडकासारखं उडी मारून तयार असतो. 
पण घरात सर्वाना दाखवतो की, बघा मी किती काम करतो, असं सतत बोलून बोलून घरात आपले पाठीराखे तयार करतो.
(भाइयों,  हुवा के नही हुवा, किया के नही किया)
खरंतर बाहेर बाहेर फिरून घरच्याचे पैसे देऊन सामान विकत आणण्याशिवाय घरासाठी काहीही उपयोग झालेला नसतो.
त्यातही काही वस्तू स्वतःसाठीच किंवा आपल्या मित्रांसाठीच आणलेल्या असतात.(अडाणी, अंबानी, रामदेव यांच्यासाठीच)
हा मोदी ठरवतो की आपल्याला कधी कोणत्या नातेवाईकांशी नाते ठेवायचे कोणत्या नातेवाईकांना दूर करायचे. (अडवाणी आणि राजनाथ सिंग)
हा मोदी ठरवतो की कधी  कोणत्या शेजाऱ्यांशी संबंध ठेवायचे कोणाशी तोडायचे.(चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि अमेरिका)
खरंतर जो नातेवाईक किंवा शेजारी याची वाह वाह करतो तो चांगला तर जो नातेवाईक किंवा शेजारी याच्यावर टीका करतो तो या मोदींसाठी वाईट असतो. 
घरातल्या घरात जर कोणी या मोदीची कारस्थाने ओळखली,आणि ही व्यक्ती आता सगळ्यांना सांगणार असे कळले तर हा मोदी लगेच घरातील इतर सदस्यांसोबत गुप्त बैठका करून या विरोधी व्यक्तीवरच बहिष्कार टाका, त्याचीच चौकशी करा अशी मागणी करतो. (चिदंबरम, प्रियांका वढेरा, राज ठाकरे)
या विरोधी व्यक्तीला तुच्छ शुल्लक असल्याचे चित्र निर्माण करतो. (पप्पू )
त्याहूनही या विरोधी व्यक्तीने जोरदार प्रतिकार करत घरातल्यानां खरा मोदी सांगायचा प्रयत्न केला तर, मोदी सर्वांसमोर रडू लागतो, मी घर सोडून जातो. असं म्हणतं आपल्या पाठीराख्याना भावनिक करतो आणि वेळ मारून नेतो. (मै क्या झोला उठाउंगा और चला जाऊंगा)
त्याहून कधी जास्तच अंगावर आल्यावर आजारी पडतो हे दुखतय ते दुखतय असे सांगून भावनेच्या उंचीवर नेतो.(भाइयों मेरी जान को खतरा है)
काही काळानंतर आपल्या मर्जीतला बाहेरील व्यक्ती घरात आणतो, तो किती चांगला असे सांगत राहतो, आणि शेवटी घराची सर्व सूत्र या बाहेरील व्यक्तीच्या हातात देतो.(अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष)

मित्रांनो, अशा स्वभावाचा एक तरी व्यक्ती प्रत्येक मोठया कुटूंबात  असतोच पण आपल्याला या स्वभावाचे नाव माहित नव्हते, ते आपण आजपासून अमलात आणूयात. 
"मोदी स्वभाव"

-प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी
😄😄😄😄😄😄😄😄

No comments:

Post a Comment