Thursday, July 30, 2020

गावाकडच्या गोष्टी- भाग 1

गावाकडच्या गोष्टी- भाग 1
काल शेजाऱ्याकडे भांडण झालं, त्यावेळेस शेजारच्या निर्मला बाईंचे काही शब्द कानावर पडले, 

निर्मला बाई : आता ग बया,  काय करू मी? पुन्हयांदा तुम्ही ढोसून आलात, आलात तर आलात त्यात गावाला पैसे देतो म्हणून सांगून आलात.... हे माझ्या देवा.....आधीच म्या घरातली भांडी कुंडी विकून घर चालवतेय.... बँकत हुतं नव्हतं तेभी काढून घेतलं, आता काय करू मी......? 

शेठ :निर्मले,  तू गप्प बस, मी गावात माझ्या साठी पैसा गोळा करतोय ना?
 
निर्मला बाई: कुठं हाय पैसा?  किती पैसा? या आधी पण पुलवा मावशी च्या नावानं पैसा मागितला, समदा दारूत उडवला, आता परत गावात पैसा मागताय, तो पण उडवाल, ठावं नाय का मला? तुमचे बेवडे अन टवाळ दोस्त...

शेठ : निर्मले दोस्तांना मध्ये आणू नकोस, ते हायत म्हणून म्या हाय, त्यांना पाजतो,  हवं नव्ह ते देतो म्हणून म्या शेठ हाय !

निर्मला बाई : बरोबर हाय, नायतर कुत्र विचारणार नाय तुम्हाला!

शेठ :निर्मले तोंड बंद ठेव, नायतर (निर्मला बाई गप्प), जा गावात पैसा वाटायचं बघ, म्या तुझंच नाव सांगून आलोय, तूचं वाटशील म्हणून!

निर्मलाबाई : (कपाळावर हाथ मारत) आता गं माझे माय... आता काय राहिलंय बघते म्या विकायला!

-प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी

(या वरील भांडणाचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीशी, स्थळाशी, काळाशी संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

सुधरा रे, नाहीतर रस्त्यावर मोकळं फिरायची सुद्धा गैरसोय होईल.

सुधरा रे, नाहीतर रस्त्यावर मोकळं फिरायची सुद्धा गैरसोय होईल.
         कोरोना च्या संकटामूळे सध्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्व पक्षीय आणि निपक्षी लोकांची एकी बघायला मिळत आहे.
भाजपा चे फसनवीस, तावडे, दानवे, मुनगंटीवार, चं.पा., महाजन किंवा इतर कोणीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडिया वर काहीही बोलला की या भाजपेई ची  वाजवायला सगळेच पुढे येतं आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची फौज तर होतीच आता शिवसैनिकांनी नडला तो संपला म्हणत हातभार लावायला सुरवात केलीय.
हे तर काहीच नाही मसैनिक ही त्यांच्या स्टाईल ने या भाजपेई च्या बुडाखाली आणि कानाखाली जाळ काढत आहेत.
मग आमच्या सारखे निपक्षी मित्र मंडळी जे हे काम तर करीत होतोच आता तर आणखीन उत्साह वाढलाय. 

अशा संकट समयी तुम्ही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र विरोधी कट कारस्थान करत असाल, विकृत राजकारण खेळत असाल तर हा महाराष्ट्र कधीही एक होऊन तुम्हाला गाडू शकतो.
अहो विरोधी पक्ष म्हणजे काय असतो ते राहुल गांधी यांच्या कडून शिका, सध्या तर विरोधी पक्षात काय कुठेच नाहीत. त्यांच्या प्रत्येक शब्दातून ते या समयी सरकार सोबत असल्याचेच दिसून येत आहे. 
जे काम विरोधी पक्षनेत्याने करायला हवे तेच काम सध्या ते कुठेही नसताना करीत आहे. सरकार ला मार्गदर्शन, वेळोवेळी सहकार्य करताना दिसत आहेत. 
पण तुम्ही सहकार्य सोडा आपल्या चतुर पत्रकार आणि संपादकांना सोबत  घेत फक्त मागून विकृत राजकारण आणि खेळ करताना दिसताय.
सगळ्यांनी सोबत येत वाजवायला सुरुवात केल्यावर आता जसे तुम्ही घाबरून स्वतः च्या पोस्ट डिलीट करतायेत.
तीच भीती महाराष्ट्राची आहे, सुधरा रे नाहीतर रस्त्यावर मोकळं फिरायची सुद्धा गैरसोय होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतायेत चांगलं काम हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, तर तुम्ही सोबत या, साथ द्या. 
- प्रमोद शिंदे 
स्वराज्यरक्षक भारत

दारू ची दुकानें सुरु करणे, जबरदस्तीने चिखलात पाय घालणे.

दारू ची दुकानें सुरु करणे, जबरदस्तीने चिखलात पाय घालणे.

केंद्र आणि राज्य सरकारला  हा  असला निर्णय घ्यावा लागतोय हे आपलं दुर्दैव आहे, पण निर्णय चूक असेही म्हणता येतं नाही.
प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या चौकडीच्या कार्यकुशलतेने अगोदरच GDP हा 4% वर आला होता, यात कोरोनो मूळे  तो 1.5% वर आला. 
देशाचा आर्थिक कणा असलेल्या रिसर्व बँकेत पैसे नाहीत, 
वर्षभराअगोदर मोदींनी रिसर्व बँकेतून 1.76 लाख करोड काढून घेतले,  देश चालवायला की कशासाठी कुणास ठाऊक? 
उद्योजकांच्या लबाडीच्या 68000 करोड वर पाणी सोडलं, जप्त केलेल्या संपत्ती ची काही माहिती नाही.(जप्त केले की नाही हेही माहिती नाही.)
नोटबंदी आणि GST मूळे कंपन्या, छोटे उद्द्योग बंद.
सरकारी उद्योग खाजगी व्यापाऱ्यांना चालवायला दिले.
हिंदू मुस्लिम च्या राजकारणात देशाकडे दुर्लक्ष, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलीय. 
या मनमानी कारभारामुळे आतापर्यंत 3 गव्हर्नर यांनी राजीनामा दिलाय.
त्यातलेच एक अर्थतज्ञ रघुरामन राजन आणि इतर अर्थशास्त्राचे अभ्यासक असे सांगत आहेत, की देश आर्थिक संकटात आहे. 
राज्यांचे GST चे पैसे परत करायला मोदीजी कडे पैसा नाहीय.
आपल्या महाराष्ट्राचे 15558 करोड केंद्राकडे अडकले आहेत.
अशावेळेस दुसरा एखादा मार्ग आहे का? माहिती नाही. 
पण मोदीजी त्यांची चौकडी या सर्वांच्या कर्माची फळं देशाला म्हणजेच देशाच्या प्रत्येक नागरिकाला भोगावी लागत आहेत. 
कोण जाणे भविष्यात अजून काय असेल? 
- प्रमोद शिंदे 
  मुंबई

भ्रष्टाचार म्हणजे काय रे दादा?

भ्रष्टाचार म्हणजेच काय रे दादा? ताई तू तरी सांगशील का? 

नोटबंदी- 99.89% पैसा परत आला. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद को. बँक, लि.ने सगळ्यात जास्त वसुली केली,  60%च्या हिशोबाने काळा पैसा परत पांढरा झाला.
तरीही तो भ्रष्टाचार नाही. 
राफेल विमान :60, 000 करोड चा खरेदी घोटाळा,  प्रधानमंत्री मोदी यांच्या ऑफिस मधूनच फाईली चोरीला जातात. जर तो भ्रष्टाचार नव्हता तर फाईल्स चोरीला कशा जातात हा प्रश्न आम्हाला अजिबात पडत नाही.  या एवढ्या मोठ्या चोरीचा कुठेही बोलबाला नाही की  शोध नाही, या प्रकरणात हा भ्रष्टाचार नाही असे सांगणारा, जज रंजन गोगई भाजपा कडून राज्यसभेत खासदार होतो.
तरीही राफेल भ्रष्टाचार नाही. 
PM केअर - प्रधानमंत्री देशाच्या जनतेकडून पैसा मागतो, 
पण यांचा हिशोब देण्यास नकार देतो, हा पैसा सरकारी हिशोबनीस (ऑडिटर) तपासणार नाहीत असे आदेश काढतो.
तरीही हा भ्रष्टाचार नाही.
असे छोटे मोठे पण करोडो मधीलच आसाम, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात,  कर्नाटक या आणि अशा अनेक  राज्यातून  25 ते 30 च्या वर भ्रष्टाचाराची प्रकरणं दिसतात. परंतु कुठेही वाच्यता नाही, कोणत्याही बातमी पत्रात साधी  बातमी नाही किंवा वाहिनीवर नाही.याच संबंधित "THE WIRE " या नियतकालिकेच्या संकेत स्थळावर संपूर्ण संशोधित बातम्या पाहिल्यावर  डोळे पांढरे होतात.
काँग्रेस सरकार च्या भ्रष्टाचारावर बोटं ठेवून "अब की बार मोदी सरकार" आणलं, ते हेच का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
इथे काही भक्तगण असे म्हणतात की "THE WIRE" हे मोदी विरोधी आहे,  आणि तुम्ही सुद्धा !
अरे दादा आणि ताई तुम्ही हे शाळेत शिकला नाहीत का? 
नेहमी कोण बोलतोय त्यापेक्षा काय बोलतोय हे महत्वाचे असतें. 
कोणत्याही गोष्टीमागे काय? कसे? कोणी? कधी? कोणते? 
हे पाच प्रश्न विचारायला हवेत.
असो सरकार कोणतेही असो आम्ही जे चुकीचं आहे, जे देशविरोधी आहे, घटनेच्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय विरोधी आहे त्यावर बोलणारच!
अजून कित्येक धमक्या पचवायची हिम्मत आहे आमच्यात!
इन्कलाब जिंदाबाद !
-प्रमोद शिंदे 
मुंबई

ऑनलाईन शाळेची फी आणि पालक

ऑनलाईन शाळेची फीस आणि पालक 

काल 31 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळे संदर्भातनिर्णय घेण्यासाठी मीटिंग घेतली, त्यात काही मंत्रिमंडळ सदस्य, काही शिक्षणतज्ञ आणि काही शाळा संचालक होते म्हणे!
या सर्वांनी मिळून दुर्गम भागात प्रत्यक्ष शाळा तर शहरी  भागात शाळेला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय घोषित केला. 
स्वागत आहे,  पण या बैठकीत पालकांचा प्रतिनिधी म्हणून कोणी नव्हतं का? त्यांना कोणी विचारलं का? 
प्रत्यक्ष शाळेत जेवढी फीस होती आता ऑनलाईन शिक्षणात ही तेवढीच फी आकारली जाते आहे म्हणून म्हटलं, प्रश्न पडला.
ऑनलाईन शारीरिक शिक्षण, स्कूल ग्राउंड, लायब्ररी, कॉम्प्युटर, प्रयोगशाळा सगळं काही बदलणार, मुळात नाहीशी होणार मग फी तेवढीच कशी? अशी मार्केटिंग सुरू आहे.
अशा  धंदेवाईक शाळा संचालकांना सरकार लगाम कधी लावणार? 
काही शाळा तर असे म्हणत आहेत की, शाळेवर कर्ज आहे, शाळेच्या इमारतीचे मेंटेनन्स आहे म्हणून आम्ही फीस कमी नाही करणार! नाहीतर तुमच्याकडे दुसरे पर्याय आहेत.
एवढा व्यावसायिक पणा अंगात शिरलाय की वर्षाची फी एकत्र भरा 10% सवलत घ्या तर सहा महिन्याची एकत्र भरा 5% सवलत घ्या. Ashi
आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. 
आपण कृपया याकडे लक्ष द्यावं.
या सर्वच शाळांच्या फीस आटोक्यात आणून एकाच इयत्तेत शिकणारा विद्यार्थी  मग तो कोणत्याही बोर्डाचा असो किंवा  कोणत्याही शाळेत असो फी ही सारखीच असावी.
शिक्षण हा काय बाजारातला माल आहे का?  या कंपनीचा माल एवढ्याला तर दुसऱ्या कंपनीचा तोच माल तेवढ्याला? 
उद्धव ठाकरे जी आणि वर्षाताई गायकवाड ट्विटर आणि फेसबुक द्वारे आपणाला विनंती आहे की कृपया याकडे लक्ष द्यावे. कोरोना मूळे संपूर्ण जगभरात उलथा पालथ होत असताना निदान आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गरजेचे बदल करावेत.
धन्यवाद !
- प्रमोद शिंदे (9967013336)
स्वराज्यरक्षक भारत 
(भावांनो आणि बहिणींनो आपणाला खरंच माझे म्हणणे पटत असेल तर पुढे जाऊद्या, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या पर्यंत पोहचू द्या.)

खतरनाक मोदी

प्रधानमंत्री मोदीजी को कोरोना की पहेली केस भारत मे मिलने से पहलेसेही पता था की कोरोना का बडा खतरा भारत मे आने वाला है: प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री. 
फिर तारीख क्या बताती है... 
*भारत मे कोरोना की पहली केस: 29 जनवरी 20, केरल 

*ट्रम्प और 3000 अमेरिकी भारत मे आये : 24 और 25 फेब्रुवारी, 20,  अहमदाबाद, (खुद मोदीजी ने उन्हे बुलाया और आयोजन किया था)

*मोदीजी ने अपने मन की बात बताते हुवे लॉकडाऊन किया: 24 मार्च 20, 

अब यह सवाल हमे पूछना चाहिये की, 29 जनवरी से 23 मार्च इन 54 दिनो तक मोदीजी कौनसा खेत जो रहे थे? 

इससे यही साबित होता है की मोदीजी, उनकी चौकडी और भक्तो ने जानबुजकर हमारे देश मे कोरोना लाया और फैलने दिया |

अरारारारा खतरनाक मोदी ! 

- स्वराज्यरक्षक भारत

गावाकडच्या गोष्टी - भाग 2

गावाकडच्या गोष्टी- भाग 2

मागच्या भागात आपण पाहिलंत, शेठ नी गावात जाहीर केलं की ते गावासाठी पैसा देणार, त्यामुळे निर्मलाबाई काहीशा चिंतेत होत्या. 
आता पुढे...
निर्मलाबाई : आलात का? कुठे होतात 15 दिवस? 
शेठ : हे बघ निर्मले, मला सांग तू माझी  भक्त आहेस की नाय? 
निर्मला बाई : डोम्बल माझं! हे काय आता नवीन? 
शेठ : निर्मले, गावात मी असलो नसलो तरी माझ्या बद्दल माझे भक्त कधी काय विचारतात का? 
निर्मलाबाई :नाय 
शेठ : मी कुठे जातो, काय करतो? किती तरी दिवस दिसत नाय, तरी हे भक्त कधी विचारतात का? 
निर्मला बाई :नाय 
शेठ : का? सांग 
निर्मलाबाई : नाय ठाऊक !
शेठ : अगं, माझ्या भक्तांना माझ्या दोस्तानी असं सांगितलंय की मी 22 तास काम करतो.
निर्मला बाई :मग? 
शेठ : त्यामुळे माझे भक्त जसे मला विचारत नाही अन मी पंधरा दिवसांनी भी समोर येऊन जे काही सांगेन त्याला माना हलवतात ना,  तसंच तू भी करायचं !
निर्मलाबाई : अहो पण तुमच्या सांगण्याहून म्या गावातील लोकांना मदत मिळेल म्हणून सांगून आले,  एकदा नाय तर चार दिस रोज जात होते. पण मग आता कुठून आणू पैसा? 
शेठ : निर्मले,  निर्मले मदत नाय गं,  कर्ज....कर्ज.... 
निर्मलाबाई : हो तेच ते कर्ज.... पण कुठून देऊ? 
शेठ : तू तर नविन असल्यागत बोलू नकोस, अगं पॅकेज बोलायचं! किती छान शब्द आहे पॅ...के....ज 
मग आपल्या सगळ्या गाढवांना 
गावभर पॅकेज जाहीर..... पॅकेज जाहीर.. असं बोंबलायला सांगायचं !
निर्मलाबाई : गाढवांना? 
 शेठ : अगं गाढवांना म्हणजे गाढवावर बसून दवंडी देणाऱ्या दवंडी खोरानां  !
नाय तर काय कामाचे आहेत ते! मी जे सांगल ते बोंबलायचं !
एकदा सगळीकडे गावभर पसरलं  की लोकं शांत बसत्यात, मग माझे भक्त आहेतच की टाळया वाजवायला!
निर्मलाबाई :अहो पण कोणी कर्ज मागायला आलाच तर त्या कर्जाला पैसा आणू कुठून? 
शेठ : निर्मले, अगं आधीच लोकं कर्ज म्हटलं की घाबरतात त्यामुळे कुणी जास्त पुढं येत नाही आणि एखादं आलंच तर आपल्याला थोडीच द्यायचंय कर्ज ते त्या बँका बघून घेतील....
निर्मलाबाई : वा वा वा... हात जोडले तुमच्यासमोर
क्रमश..... 
- -प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी

(या वरील चर्चेचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीशी, स्थळाशी, काळाशी संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

गावाकडच्या गोष्टी- भाग 3

गावाकडच्या गोष्टी - भाग 3

शेठ गावाच्या पारावर दोन्ही पायाची कमरेत घडी करून गुडघे छातीला चिटकवून झाडाला टेकून हातात बारीक काडी घेऊन दात कोरत बसले आहेत. एवढ्यात दोन जण धावत धापा टाकत येतात. 
दोघे एकत्र : शेठ... शेठ.. शेठ.. 
शेठ :काय झाले? कायले ओरडून राहिले? 
(पहिला ज्याचे नाव नरसिंग आहे.) नरसिंग : शेठ आनंदाची बातमी आहे, आपल्या गावावर हल्ला झालाय?  आपले 20 गावकरी मारले गेले. 
शेठ :म्हणजे? 
नरसिंग : तुम्ही महान आहात, काय डोकेलिटी हाय तुमची, दरवळे प्रमाणे बिरवी पाड्याच्या निवडणुकी आधी बरोबर हल्ला.. वा वा 
शेठ : पन मी काय केलंच नाय, या वेळी त्या बाजूच्या इमाम ला सांगणार होतो, पन त्या येड्यानं  सांगायच्या आधीच केलं की काय? छान,  चला माझ्या ऍक्टिंग ची वेळ आली, चला स्क्रिप्ट लिहा, धुमाळ ला सांगून बॅटिंग ची तयारी करा. 
दोघे : आं? 
शेठ : बॅटिंग बॅटिंग.. स्ट्राईक रे 
नरसिंग : हम्म हॅम,  ते करू हो, त्याला थोडीच वेळ लागतोय, फक्त शब्द बदलायचेत, इथले तिथे, अन तिथले इथे, हो पन आता उजवीकडच्या इमाम च्या लोकांनी नाय तर डावीकडच्या चाणर गावच्या लोकांनी केलाय हल्ला ! 
(त्या चौघात दुसरा घावडेकर नावाने आहे.)
घावडेकर : शेठ, मानलं हा तुम्हाला,  त्या इमाम नंतर तुम्ही चाणर च्या पिंगपिंग ला पन आपल्या सोबत घेतलात. 
हे ऐकताच शेठ पटकन उभे राहतात, त्यांचे पाय लटपटू लागतात. 
शेठ : श्या.... म्या...... श्या..... म्या... श्या श्या श्या (मोठ्याने ओरडू लागतात.)
सगळेच : काय झालं? काय झालं? 
शेठ : ये गपा... श्या श्या... 
एवढ्यात मागच्या शेतातून टमरेल हातात घेऊन श्या.. म्या बाहेर येतो. 
श्याम्या :काय झालं? कायले बोंबलून राहिला बे !
शेठ : बे? 
श्याम्या : हं सॉरी, जुनी दोस्ती ? 
शेठ : हम्म... इथे नाय (डोळे मोठे करत )
शेठ :अरे तू शेतात का गेलास, तु आता घरसंत्री आहेस, इंग्लिश दिलंय ना तुझ्या मोरीत बसवून? 
श्याम्या : अरे तुला माहित नाय का? जुन्या लफड्यात जेलात होतो  तवा लय सुजलाय, तिथली सवय जात नाय खाली बसायची. माझं जाऊदे तू बोल काय झालं? 
शेठ : अरे त्या पिंगपिंग ने हल्ला केलाय, 
श्याम्या : करुदेत, त्या तात्याचं अन त्याचं जुनं झेंगाट हाय !
शेठ : अरे त्यानं तात्यांवर नाय, आपल्यावर, आपल्या गावावर हल्ला केलाय.
(आता हे ऐकून श्याम्याचेही पायही थरथर कापू लागतात.)
नरसिंग : ते गावांत घुसलेत, आपली 20 माणसे मारली, काहींना डांबलाय, म्हणत्यात, मागच्या गल्लीतलं खोरं त्यांचं हाय? 
श्याम्या : अरे तो धुमाळ कुठाय? वरच्या आळीतल्या मिटिंग नंतर कुठं दिसलाच  नाय, कुठाय शोध.  
नरसिंग : शोधतो, भेटल्यावर काय सांगू?  सांगू का स्ट्राईक कर म्हणून.. 
शेठ : अरे काय बोलतो तू? माझे पाय अन हाथ बघ! कसे हलत्यात...अन तू अजून फाड माझी ! अरे चर्चा करायला पाहिजे ! जा..
श्याम्या : कुणा कुणाला माहिताय हे ? 
घावडेकर :समद्या गावाला !
शेठ :कसं? 
घावडेकर : या नरसिंग ने पेपर अन केबल वाल्याला सांगून टाकलं, पिंग पिंग वाले गावात वेशीच्या आत घुसले, 20 मारले, काही पकडले !
शेठ : अरे काय हे... काय अक्कल हाय का नाय? कायला बोंबललास? 
नरसिंग : मला वाटलं, तुम्हीच करवलात, मधल्या पाड्याच्या इलेक्शन साठी, म्हटलं,  तुम्ही शाबासकी द्याल.. म्हणून बोललो !
शेठ : तुझ्या............( बीप)
श्याम्या : शेठ शेठ थांबा, सेन्सॉर आहे...
शेठ : श्याम्या... श्या, आता काय करायचं?   मागच्या वेळेस पन त्यांनी हल्ला केला, तवा मी तुमची बुलेट गाडी अन पाटलांचा पुतळा घेतो असे पाय पकडून सांगितलं तेंव्हा ते थांबले.
पन कुणाला हे कळू दिलं नाही.
पन आता तर पाय सोडा... काय पकडायला लावतो तो पिंग पिंग कुणास ठाऊक? 
श्याम्या : शेठ घाबरू नका, मी आहे ना? करूयात काय तरी !
(विचार करत,  मग अचानक सुचल्यासारखं) हम्म, शेठ, पहिलं तुम्ही आपल्या पेपर आणि केबल वाल्याना सांगा, पिंग पिंग आपल्या वेशीच्या आत आलाच नाय !
नरसिंग :पन मी बोललो ना? 
श्याम्या : तुला कोण विचारतो का? तू गप्प.. आपल्या सगळ्या चड्डिधारी अन भक्तांना सांगा पिंग पिंग चा सामान घेऊ नका, पिंग पिंग चे पुतळे जाळा. लोक हे करतील, थोडी उसंत मिळेल.
आपल्या केबल आणि पेपर वाल्याना सांगा बातम्या लावा, "आपल्याला सगळेच सपोर्ट करतायेत, पिंग पिंग एकटा पडलाय ! तात्या असं बोलला, मामा असं बोलला,  लिहायला सांगा. पिंग पिंग घाबरला लिहा." 
अन शेठ, तुम्ही सांगायचं, पिंग पिंग ची माणसं गावाच्या वेशीत आलीच नाय, आली तर आम्ही सोडणार नाय! शांत बसणार नाय ! 
घावडेकर :  पन आपल्या विरोधात असलेल्यानी खरं सांगितलं तर? 
शेठ : सांगायचं? अशा वेळेस राजकारण नका करू, (हसत हसत) या शेठ चा अपमान म्हणजे गावाचा अपमान, गावातल्या समद्यांचा अपमान... हा हा हा (चौघे हसतात.)
श्याम्या तूचं माझा खरा मैतर.. 
(दोघे मिठी मारतात )
क्रमश... 
- प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी 
(वरील चर्चेचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीशी,  स्थळाशी, काळाशी काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा. )

ऑपेरेशन लोटस

ऑपेरेशन लोटस... 
मीडियाने किती छान नाव दिलंय ना? ऐकल्यावर असं वाटतं, काही तरी ऑपेरेशन लडाख, ऑपेरेशन कारगिल आणि ऑपेरेशन उरी असं शौर्याची गोष्ट असावी.
 पण आहे काय तर...
रात्री बेरात्री दुसऱ्या पक्षातील आमदार, खासदार किंवा लोकप्रिय नेत्यांना भेटणे. 
त्यांची किंमत ठरवणे, त्यांना विकत घेणे. 
विकला जात नसेल तर आपल्या हातातील यंत्रणेचा वापर करून धमकावणे, चौकशी ची भीती दाखवत स्वतः कडे ओढणे.
आपल्याबाजूने येऊ शकत नसेल तर गप्प बसायला भाग पाडणे. 
आणि हे आमदार खासदार आणि विकत घ्यायला सामान्य लोकांच्या खिशातूनच पैसा काढणे. 
खरं तर ही विकृती आहे, नीचपणाचा कळस आहे. आणि याच नीचपणाला दोन्ही मीडिया प्रिंट आणि टीव्ही मीडिया "ऑपेरेशन लोटस" हे देऊन अशा अनेक मोहिमांमध्ये प्राण अर्पण करणाऱ्या भारतीय सैन्याचा अपमान करीत आहे. 
किती मर्यादा सोडाल रे पत्रकारितेची !
धन्यवाद !
- प्रमोद शिंदे 
स्वराज्यरक्षक भारत

गावाकडच्या गोष्टी- भाग 4

गावाकडच्या गोष्टी- भाग चार 

मित्रांनो, मोदी आपल्यासाठी नविन नाहीय, प्रत्येक मोठ्या कुटुंबात एक तरी मोदी असतोच. 
मोदी म्हणजे काय तर... 
या मोदीला घरातली कामे म्हटलं नाकी नऊ येतात पण बाहेर फिरायची कामे असतील तर बेडकासारखं उडी मारून तयार असतो. 
पण घरात सर्वाना दाखवतो की, बघा मी किती काम करतो, असं सतत बोलून बोलून घरात आपले पाठीराखे तयार करतो.
(भाइयों,  हुवा के नही हुवा, किया के नही किया)
खरंतर बाहेर बाहेर फिरून घरच्याचे पैसे देऊन सामान विकत आणण्याशिवाय घरासाठी काहीही उपयोग झालेला नसतो.
त्यातही काही वस्तू स्वतःसाठीच किंवा आपल्या मित्रांसाठीच आणलेल्या असतात.(अडाणी, अंबानी, रामदेव यांच्यासाठीच)
हा मोदी ठरवतो की आपल्याला कधी कोणत्या नातेवाईकांशी नाते ठेवायचे कोणत्या नातेवाईकांना दूर करायचे. (अडवाणी आणि राजनाथ सिंग)
हा मोदी ठरवतो की कधी  कोणत्या शेजाऱ्यांशी संबंध ठेवायचे कोणाशी तोडायचे.(चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि अमेरिका)
खरंतर जो नातेवाईक किंवा शेजारी याची वाह वाह करतो तो चांगला तर जो नातेवाईक किंवा शेजारी याच्यावर टीका करतो तो या मोदींसाठी वाईट असतो. 
घरातल्या घरात जर कोणी या मोदीची कारस्थाने ओळखली,आणि ही व्यक्ती आता सगळ्यांना सांगणार असे कळले तर हा मोदी लगेच घरातील इतर सदस्यांसोबत गुप्त बैठका करून या विरोधी व्यक्तीवरच बहिष्कार टाका, त्याचीच चौकशी करा अशी मागणी करतो. (चिदंबरम, प्रियांका वढेरा, राज ठाकरे)
या विरोधी व्यक्तीला तुच्छ शुल्लक असल्याचे चित्र निर्माण करतो. (पप्पू )
त्याहूनही या विरोधी व्यक्तीने जोरदार प्रतिकार करत घरातल्यानां खरा मोदी सांगायचा प्रयत्न केला तर, मोदी सर्वांसमोर रडू लागतो, मी घर सोडून जातो. असं म्हणतं आपल्या पाठीराख्याना भावनिक करतो आणि वेळ मारून नेतो. (मै क्या झोला उठाउंगा और चला जाऊंगा)
त्याहून कधी जास्तच अंगावर आल्यावर आजारी पडतो हे दुखतय ते दुखतय असे सांगून भावनेच्या उंचीवर नेतो.(भाइयों मेरी जान को खतरा है)
काही काळानंतर आपल्या मर्जीतला बाहेरील व्यक्ती घरात आणतो, तो किती चांगला असे सांगत राहतो, आणि शेवटी घराची सर्व सूत्र या बाहेरील व्यक्तीच्या हातात देतो.(अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष)

मित्रांनो, अशा स्वभावाचा एक तरी व्यक्ती प्रत्येक मोठया कुटूंबात  असतोच पण आपल्याला या स्वभावाचे नाव माहित नव्हते, ते आपण आजपासून अमलात आणूयात. 
"मोदी स्वभाव"

-प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी
😄😄😄😄😄😄😄😄