Thursday, July 30, 2020

सुधरा रे, नाहीतर रस्त्यावर मोकळं फिरायची सुद्धा गैरसोय होईल.

सुधरा रे, नाहीतर रस्त्यावर मोकळं फिरायची सुद्धा गैरसोय होईल.
         कोरोना च्या संकटामूळे सध्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्व पक्षीय आणि निपक्षी लोकांची एकी बघायला मिळत आहे.
भाजपा चे फसनवीस, तावडे, दानवे, मुनगंटीवार, चं.पा., महाजन किंवा इतर कोणीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडिया वर काहीही बोलला की या भाजपेई ची  वाजवायला सगळेच पुढे येतं आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची फौज तर होतीच आता शिवसैनिकांनी नडला तो संपला म्हणत हातभार लावायला सुरवात केलीय.
हे तर काहीच नाही मसैनिक ही त्यांच्या स्टाईल ने या भाजपेई च्या बुडाखाली आणि कानाखाली जाळ काढत आहेत.
मग आमच्या सारखे निपक्षी मित्र मंडळी जे हे काम तर करीत होतोच आता तर आणखीन उत्साह वाढलाय. 

अशा संकट समयी तुम्ही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र विरोधी कट कारस्थान करत असाल, विकृत राजकारण खेळत असाल तर हा महाराष्ट्र कधीही एक होऊन तुम्हाला गाडू शकतो.
अहो विरोधी पक्ष म्हणजे काय असतो ते राहुल गांधी यांच्या कडून शिका, सध्या तर विरोधी पक्षात काय कुठेच नाहीत. त्यांच्या प्रत्येक शब्दातून ते या समयी सरकार सोबत असल्याचेच दिसून येत आहे. 
जे काम विरोधी पक्षनेत्याने करायला हवे तेच काम सध्या ते कुठेही नसताना करीत आहे. सरकार ला मार्गदर्शन, वेळोवेळी सहकार्य करताना दिसत आहेत. 
पण तुम्ही सहकार्य सोडा आपल्या चतुर पत्रकार आणि संपादकांना सोबत  घेत फक्त मागून विकृत राजकारण आणि खेळ करताना दिसताय.
सगळ्यांनी सोबत येत वाजवायला सुरुवात केल्यावर आता जसे तुम्ही घाबरून स्वतः च्या पोस्ट डिलीट करतायेत.
तीच भीती महाराष्ट्राची आहे, सुधरा रे नाहीतर रस्त्यावर मोकळं फिरायची सुद्धा गैरसोय होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतायेत चांगलं काम हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, तर तुम्ही सोबत या, साथ द्या. 
- प्रमोद शिंदे 
स्वराज्यरक्षक भारत

No comments:

Post a Comment