गावाकडच्या गोष्टी- भाग 2
मागच्या भागात आपण पाहिलंत, शेठ नी गावात जाहीर केलं की ते गावासाठी पैसा देणार, त्यामुळे निर्मलाबाई काहीशा चिंतेत होत्या.
आता पुढे...
निर्मलाबाई : आलात का? कुठे होतात 15 दिवस?
शेठ : हे बघ निर्मले, मला सांग तू माझी भक्त आहेस की नाय?
निर्मला बाई : डोम्बल माझं! हे काय आता नवीन?
शेठ : निर्मले, गावात मी असलो नसलो तरी माझ्या बद्दल माझे भक्त कधी काय विचारतात का?
निर्मलाबाई :नाय
शेठ : मी कुठे जातो, काय करतो? किती तरी दिवस दिसत नाय, तरी हे भक्त कधी विचारतात का?
निर्मला बाई :नाय
शेठ : का? सांग
निर्मलाबाई : नाय ठाऊक !
शेठ : अगं, माझ्या भक्तांना माझ्या दोस्तानी असं सांगितलंय की मी 22 तास काम करतो.
निर्मला बाई :मग?
शेठ : त्यामुळे माझे भक्त जसे मला विचारत नाही अन मी पंधरा दिवसांनी भी समोर येऊन जे काही सांगेन त्याला माना हलवतात ना, तसंच तू भी करायचं !
निर्मलाबाई : अहो पण तुमच्या सांगण्याहून म्या गावातील लोकांना मदत मिळेल म्हणून सांगून आले, एकदा नाय तर चार दिस रोज जात होते. पण मग आता कुठून आणू पैसा?
शेठ : निर्मले, निर्मले मदत नाय गं, कर्ज....कर्ज....
निर्मलाबाई : हो तेच ते कर्ज.... पण कुठून देऊ?
शेठ : तू तर नविन असल्यागत बोलू नकोस, अगं पॅकेज बोलायचं! किती छान शब्द आहे पॅ...के....ज
मग आपल्या सगळ्या गाढवांना
गावभर पॅकेज जाहीर..... पॅकेज जाहीर.. असं बोंबलायला सांगायचं !
निर्मलाबाई : गाढवांना?
शेठ : अगं गाढवांना म्हणजे गाढवावर बसून दवंडी देणाऱ्या दवंडी खोरानां !
नाय तर काय कामाचे आहेत ते! मी जे सांगल ते बोंबलायचं !
एकदा सगळीकडे गावभर पसरलं की लोकं शांत बसत्यात, मग माझे भक्त आहेतच की टाळया वाजवायला!
निर्मलाबाई :अहो पण कोणी कर्ज मागायला आलाच तर त्या कर्जाला पैसा आणू कुठून?
शेठ : निर्मले, अगं आधीच लोकं कर्ज म्हटलं की घाबरतात त्यामुळे कुणी जास्त पुढं येत नाही आणि एखादं आलंच तर आपल्याला थोडीच द्यायचंय कर्ज ते त्या बँका बघून घेतील....
निर्मलाबाई : वा वा वा... हात जोडले तुमच्यासमोर
क्रमश.....
- -प्रमोद शिंदे
गावाकडच्या गोष्टी
No comments:
Post a Comment