Thursday, July 30, 2020

ऑनलाईन शाळेची फी आणि पालक

ऑनलाईन शाळेची फीस आणि पालक 

काल 31 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळे संदर्भातनिर्णय घेण्यासाठी मीटिंग घेतली, त्यात काही मंत्रिमंडळ सदस्य, काही शिक्षणतज्ञ आणि काही शाळा संचालक होते म्हणे!
या सर्वांनी मिळून दुर्गम भागात प्रत्यक्ष शाळा तर शहरी  भागात शाळेला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय घोषित केला. 
स्वागत आहे,  पण या बैठकीत पालकांचा प्रतिनिधी म्हणून कोणी नव्हतं का? त्यांना कोणी विचारलं का? 
प्रत्यक्ष शाळेत जेवढी फीस होती आता ऑनलाईन शिक्षणात ही तेवढीच फी आकारली जाते आहे म्हणून म्हटलं, प्रश्न पडला.
ऑनलाईन शारीरिक शिक्षण, स्कूल ग्राउंड, लायब्ररी, कॉम्प्युटर, प्रयोगशाळा सगळं काही बदलणार, मुळात नाहीशी होणार मग फी तेवढीच कशी? अशी मार्केटिंग सुरू आहे.
अशा  धंदेवाईक शाळा संचालकांना सरकार लगाम कधी लावणार? 
काही शाळा तर असे म्हणत आहेत की, शाळेवर कर्ज आहे, शाळेच्या इमारतीचे मेंटेनन्स आहे म्हणून आम्ही फीस कमी नाही करणार! नाहीतर तुमच्याकडे दुसरे पर्याय आहेत.
एवढा व्यावसायिक पणा अंगात शिरलाय की वर्षाची फी एकत्र भरा 10% सवलत घ्या तर सहा महिन्याची एकत्र भरा 5% सवलत घ्या. Ashi
आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. 
आपण कृपया याकडे लक्ष द्यावं.
या सर्वच शाळांच्या फीस आटोक्यात आणून एकाच इयत्तेत शिकणारा विद्यार्थी  मग तो कोणत्याही बोर्डाचा असो किंवा  कोणत्याही शाळेत असो फी ही सारखीच असावी.
शिक्षण हा काय बाजारातला माल आहे का?  या कंपनीचा माल एवढ्याला तर दुसऱ्या कंपनीचा तोच माल तेवढ्याला? 
उद्धव ठाकरे जी आणि वर्षाताई गायकवाड ट्विटर आणि फेसबुक द्वारे आपणाला विनंती आहे की कृपया याकडे लक्ष द्यावे. कोरोना मूळे संपूर्ण जगभरात उलथा पालथ होत असताना निदान आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गरजेचे बदल करावेत.
धन्यवाद !
- प्रमोद शिंदे (9967013336)
स्वराज्यरक्षक भारत 
(भावांनो आणि बहिणींनो आपणाला खरंच माझे म्हणणे पटत असेल तर पुढे जाऊद्या, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या पर्यंत पोहचू द्या.)

No comments:

Post a Comment