Thursday, July 30, 2020

ऑपेरेशन लोटस

ऑपेरेशन लोटस... 
मीडियाने किती छान नाव दिलंय ना? ऐकल्यावर असं वाटतं, काही तरी ऑपेरेशन लडाख, ऑपेरेशन कारगिल आणि ऑपेरेशन उरी असं शौर्याची गोष्ट असावी.
 पण आहे काय तर...
रात्री बेरात्री दुसऱ्या पक्षातील आमदार, खासदार किंवा लोकप्रिय नेत्यांना भेटणे. 
त्यांची किंमत ठरवणे, त्यांना विकत घेणे. 
विकला जात नसेल तर आपल्या हातातील यंत्रणेचा वापर करून धमकावणे, चौकशी ची भीती दाखवत स्वतः कडे ओढणे.
आपल्याबाजूने येऊ शकत नसेल तर गप्प बसायला भाग पाडणे. 
आणि हे आमदार खासदार आणि विकत घ्यायला सामान्य लोकांच्या खिशातूनच पैसा काढणे. 
खरं तर ही विकृती आहे, नीचपणाचा कळस आहे. आणि याच नीचपणाला दोन्ही मीडिया प्रिंट आणि टीव्ही मीडिया "ऑपेरेशन लोटस" हे देऊन अशा अनेक मोहिमांमध्ये प्राण अर्पण करणाऱ्या भारतीय सैन्याचा अपमान करीत आहे. 
किती मर्यादा सोडाल रे पत्रकारितेची !
धन्यवाद !
- प्रमोद शिंदे 
स्वराज्यरक्षक भारत

No comments:

Post a Comment