भ्रष्टाचार म्हणजेच काय रे दादा? ताई तू तरी सांगशील का?
नोटबंदी- 99.89% पैसा परत आला. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद को. बँक, लि.ने सगळ्यात जास्त वसुली केली, 60%च्या हिशोबाने काळा पैसा परत पांढरा झाला.
तरीही तो भ्रष्टाचार नाही.
राफेल विमान :60, 000 करोड चा खरेदी घोटाळा, प्रधानमंत्री मोदी यांच्या ऑफिस मधूनच फाईली चोरीला जातात. जर तो भ्रष्टाचार नव्हता तर फाईल्स चोरीला कशा जातात हा प्रश्न आम्हाला अजिबात पडत नाही. या एवढ्या मोठ्या चोरीचा कुठेही बोलबाला नाही की शोध नाही, या प्रकरणात हा भ्रष्टाचार नाही असे सांगणारा, जज रंजन गोगई भाजपा कडून राज्यसभेत खासदार होतो.
तरीही राफेल भ्रष्टाचार नाही.
PM केअर - प्रधानमंत्री देशाच्या जनतेकडून पैसा मागतो,
पण यांचा हिशोब देण्यास नकार देतो, हा पैसा सरकारी हिशोबनीस (ऑडिटर) तपासणार नाहीत असे आदेश काढतो.
तरीही हा भ्रष्टाचार नाही.
असे छोटे मोठे पण करोडो मधीलच आसाम, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या आणि अशा अनेक राज्यातून 25 ते 30 च्या वर भ्रष्टाचाराची प्रकरणं दिसतात. परंतु कुठेही वाच्यता नाही, कोणत्याही बातमी पत्रात साधी बातमी नाही किंवा वाहिनीवर नाही.याच संबंधित "THE WIRE " या नियतकालिकेच्या संकेत स्थळावर संपूर्ण संशोधित बातम्या पाहिल्यावर डोळे पांढरे होतात.
काँग्रेस सरकार च्या भ्रष्टाचारावर बोटं ठेवून "अब की बार मोदी सरकार" आणलं, ते हेच का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
इथे काही भक्तगण असे म्हणतात की "THE WIRE" हे मोदी विरोधी आहे, आणि तुम्ही सुद्धा !
अरे दादा आणि ताई तुम्ही हे शाळेत शिकला नाहीत का?
नेहमी कोण बोलतोय त्यापेक्षा काय बोलतोय हे महत्वाचे असतें.
कोणत्याही गोष्टीमागे काय? कसे? कोणी? कधी? कोणते?
हे पाच प्रश्न विचारायला हवेत.
असो सरकार कोणतेही असो आम्ही जे चुकीचं आहे, जे देशविरोधी आहे, घटनेच्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय विरोधी आहे त्यावर बोलणारच!
अजून कित्येक धमक्या पचवायची हिम्मत आहे आमच्यात!
इन्कलाब जिंदाबाद !
-प्रमोद शिंदे
No comments:
Post a Comment