गावाकडच्या गोष्टी- भाग 1
काल शेजाऱ्याकडे भांडण झालं, त्यावेळेस शेजारच्या निर्मला बाईंचे काही शब्द कानावर पडले,
निर्मला बाई : आता ग बया, काय करू मी? पुन्हयांदा तुम्ही ढोसून आलात, आलात तर आलात त्यात गावाला पैसे देतो म्हणून सांगून आलात.... हे माझ्या देवा.....आधीच म्या घरातली भांडी कुंडी विकून घर चालवतेय.... बँकत हुतं नव्हतं तेभी काढून घेतलं, आता काय करू मी......?
शेठ :निर्मले, तू गप्प बस, मी गावात माझ्या साठी पैसा गोळा करतोय ना?
निर्मला बाई: कुठं हाय पैसा? किती पैसा? या आधी पण पुलवा मावशी च्या नावानं पैसा मागितला, समदा दारूत उडवला, आता परत गावात पैसा मागताय, तो पण उडवाल, ठावं नाय का मला? तुमचे बेवडे अन टवाळ दोस्त...
शेठ : निर्मले दोस्तांना मध्ये आणू नकोस, ते हायत म्हणून म्या हाय, त्यांना पाजतो, हवं नव्ह ते देतो म्हणून म्या शेठ हाय !
निर्मला बाई : बरोबर हाय, नायतर कुत्र विचारणार नाय तुम्हाला!
शेठ :निर्मले तोंड बंद ठेव, नायतर (निर्मला बाई गप्प), जा गावात पैसा वाटायचं बघ, म्या तुझंच नाव सांगून आलोय, तूचं वाटशील म्हणून!
निर्मलाबाई : (कपाळावर हाथ मारत) आता गं माझे माय... आता काय राहिलंय बघते म्या विकायला!
-प्रमोद शिंदे
गावाकडच्या गोष्टी
(या वरील भांडणाचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीशी, स्थळाशी, काळाशी संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
No comments:
Post a Comment